फुलंब्री तालुक्यात अवैध वाळू उपसा करणा-या विरोधात धडक कारवाई, 44 लाखांचा मुद्देमाल जप्त...!
फुलंब्री पोलिसांची गौण खनिजांवर धडक कारवाई; 44 लाखांचा मुद्देमाल जप्त
फुलंब्री, दि.8(डि-24 न्यूज)- फुलंब्री पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत तब्बल 44 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अंकुश नानासाहेब बागल (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाबेर शेख शमीम शेख (रा. आळंद, ता. फुलंब्री), गोविंद शंकर सिंग ठाकूर (रा. पाल), विलास प्रभाकर तुपे, नंदू रवींद्र राऊत आणि अरुण यादव पारखे (रा. महाल किनहोळा, ता. फुलंब्री) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी MH-20-EG-9595 क्रमांकाचा हायवा, त्यामध्ये भरलेले अंदाजे दोन ब्रास वाळू, MH-20-FP-8074 क्रमांकाचा जेसीबी तसेच घटनास्थळी साठवून ठेवलेली अंदाजे 150 ब्रास वाळू असा एकूण 44 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणाचा पुढील तपास फुलंब्री पोलीस करीत आहेत.
What's Your Reaction?