बायोमेडिकल कचरा रस्त्यावर आढळून आल्याने महापालिकेने वसूल केला 25 हजार दंड

 0
बायोमेडिकल कचरा रस्त्यावर आढळून आल्याने महापालिकेने वसूल केला 25 हजार दंड

बायोमेडिकल कचरा आढळून आल्याबद्दल 25 हजार रुपयांचा दंड

नागरी मित्र पथकाची धडक कारवाई...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्व झोन कार्यालय अंतर्गत सातत्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

उघड्यावर कचरा टाकने, बायोमेडिकल कचरा सबंधित एजंसीला न देता उघड्यावर टाकने या बाबत नागरी मित्र पथकाचे कर्मचारी ,स्वच्छता कर्मचारी नेहमी लक्ष ठेवून असतात.

  या अनुषंगाने आज शहरातील झोन क्रं 1 अंतर्गत नारळी बाग येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर समर्थ हॉस्पिटल नारळी बाग यांनी अनाधिकृतपने बायो मेडिकल कचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्या बाबत सहायक आयुक्त झोन क्रं 1 संजय सुरडकर यांना फोनवर तक्रार प्राप्त झाली होती. त्यांनी तत्काळ नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले.

   यानुसार प्रमोद जाधव यांनी पथकाला सदर ठिकाणी पाठवून खातरजमा करून घेतली असता त्या ठिकाणी समर्थ हॉस्पिटल यांचा मोठ्या प्रमाणावर बायोमेडिकल कचरा आढळून आला. यात वापरलेल्या इंजेक्शन सिरींज, सलाईनच्या नळ्या व इतर अपायकारक कचऱ्याचा समावेश होता. 

 याची तत्काळ दखल घेत आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रविंद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली 

नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव ,स्वच्छता निरीक्षक रोहित मगरे यांच्या नेतृत्वात सबंधित समर्थ हॉस्पिटलचे डॉ.प्रतीक्षा जैन यांचेवर 25 हजार दंडात्मक कारवाई करण्यात आली व त्यांना सक्त ताकीद देण्यात आली.

यावेळी स्वच्छता निरीक्षक रोहित मगरे, स्वच्छता जवान गणेश खरात, नागरी मित्र पथकाचे कर्मचारी देविदास सुसर, आबाराव साळुंखे यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow