बाळासाहेबांच्या शिकवणी मुळे मंत्री झालो आता खासदार बणणार - संदीपान भुमरे

 0
बाळासाहेबांच्या शिकवणी मुळे मंत्री झालो आता खासदार बणणार - संदीपान भुमरे

बाळासाहेबांच्या शिकवणुकीमुळे मी आज राज्यात मंत्री, उद्या खासदार होईल

* महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांचा विश्वास 

* माध्यमा समोर मांडली आपली भूमिका 

औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आमच्या तनामनात रुजली आहे. शिवसेनेचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन आम्ही तळागाळापर्यंत पोहोचलो आहोत. त्यांच्या याच शिकवणीमुळे मी ग्रामपंचायतच्या सरपंचापासून, पंचायत समिती सदस्य, पाच वेळा आमदार आणि आता कॅबिनेट मंत्री झालो. आणि येत्या काळात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा खासदार देखील होईल, असा विश्वास शिवसेना महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला. 

गुरुवारी दिनांक 9 मे रोजी ते माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे पुढे म्हणाले, की मी तळागाळातील कार्यकर्ता आहे. समाजाचे सुखदुःख मी जवळून पाहिले आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांच्या अडचणी फार जवळून पाहिले आहेत. मी स्वतः कारखान्यात स्लिपर बॉय म्हणून नोकरी केली आहे. त्यामुळे कामगारांच्या काय समस्या आहेत, याची मला जाणीव आहे. शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी अनेकदा गुन्हे माझ्या अंगावर झेलले आहेत. माझा राजकीय प्रवास शाखाप्रमुखापासून सुरू झाला. सुरुवातीला गावाचा उपसरपंच म्हणून देखील मी कामकाज पाहिले आहे. १९९२ ला पंचायत समिती सदस्य झालो. या काळात शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी बांधील राहिलो. लोकांचे काम केल्यामुळेच लोकांचे माझ्यावर अतोनात प्रेम आहे. त्यांच्या सुखदुःखात मी धावून जात असतो. पैठण विधानसभा मतदारसंघाचे गेली 35 वर्षे मी नेतृत्व करीत आहे. अनेक विकास कामे केली. जातीपातीचे कधी राजकारण केले नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन चालल्यामुळे आज मी या पदापर्यंत पोहोचलो आहे. ग्रामपंचायत उप सरपंच, सभापती ते आमदार पर्यंत थेट मजल मारली. आता मंत्री झालो. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे तत्व मी नेहमी अंगीकारत असतो. याच तत्वामुळे मी स्लीप बॉय ते पालक मंत्री असा प्रवास झाला. ज्या कारखान्यात मी स्लीप बॉय म्हणून नोकरी केली त्याच कारखाण्याचा मी चेअरमन झालो. या काळात बराच त्रास झाला. जस जस माणूस मोठा होत जातो तस तसा त्रास आणखीन वाढू लागतो. वैयक्तिक चिखलफेकीला आपण कधी जुमानले नाही. मी शिवसेना पक्षाचा होतो. मला नोकरीवर वारंवार त्याची आठवण करून दिल्या जायची. पण माझा निर्धार पक्का होता. नोकरी गेली तरी पक्ष सोडला नाही. याच पक्षनिष्ठेमुळे मी आज जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आणि दुधात साखर म्हणजे मी स्थानिक पालकमंत्री झालो. आणि माझ्या कार्यकाळातच औरंगाबादचे नाव संभाजी नगर लागल्या गेले. हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते आमच्या सरकारने पूर्ण केल्याचा सार्थ अभिमान आहे. सुरुवातीपासूनच मी आमच्या विधानसभा मतदार संघात मातब्बर नेत्यांना मागे टाकले. माझ्या खासदार चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांचे काही मला आव्हान नाही. माझ्या विकास कामामुळेच मी निवडून येणार आहे. आताची लढाई माझ्या विकास कामाच्या बळावर जिंकून दाखवेल. विकासाच्या मुद्द्यावर आपण जनतेशी मत मागत आहोत. मला दोघांचं ही आवाहन वाटत नाही. मला दोघांचाही अनुभव आहे. चंद्रकांत खैरेला विकासाचे अंग नाही. त्यांनाही माहिती आहे मी काय काय काम केले. शहराला मुबलक पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. १९९२ पासून ६ वेळेस धनुष्य बाणाकडून लढलो. आताही मी धनुष्य बाणावरच लढत आहे. आम्ही गद्दार नाही. खैरे गद्दार आहे. ते जर गद्दार नसेल तर त्यांनी दुसरा पक्ष का निवडला. त्यांनी दुसऱ्या चिन्ह का निवडले. ते गद्दार आहे यामुळेच त्यांनी दुसरं चिन्ह निवडले.

गाव, शहराच्या विकासात रस्ते मोलाचे कामगिरी बजावतात. दळणवळणाच्या साधनांमुळे विकास झपाट्याने होतो. पक्के रस्ते असेल तर जलद प्रवास होतो. अन्नधान्यांसह इतर सामानांची वाहतूक जलद रीतीने होऊ शकते. यामुळे येत्या काळात छत्रपती संभाजी नगर- पुणे महामार्गाचे काम हाती घेण्यात येईल. रोहयो व फलोत्पादन मंत्री पदाच्या कार्यकाळात मी अनेक जाचक अटी काढून टाकल्या. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला. विहीर, पानंद रस्ते, कांदा चाळ, गाई गोठे, फळबाग लागवड, पेवर ब्लॉक, संरक्षण भिंत आदी विकासाची कामे जिल्हाभरात झाली. सुरुवातीला 700, 800 कोटींचा होणारा खर्च हा सुमारे 1700 कोटी रुपये पर्यंत जाऊन पोहोचला. माझ्या खात्याला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केले. जिल्हाभरात केलेल्या विकास कामामुळेच जनता मला मताधिक्याने निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow