भाजपाची शहर कार्यकारीणी घोषित, नवीन चेह-यांना संधी...

भाजपा शहर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा...
भाजपाची अतिशय संतुलित कार्यकारिणी घोषित...
महिला व युवकांना स्थान देत भाजपा शहर कार्यकारिणी घोषित...
अल्पसंख्यांक मोर्चाला अध्यक्ष मिळेना अशी शहरात चर्चा आहे...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) -
भारतीय जनता पक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणीमध्ये 4 जिल्हा सरचिटणीस, 16 उपाध्यक्ष, 14 सचिव, एक कोषाध्यक्ष यासह महिला मोर्चा आणि युवा मोर्चा अध्यक्ष अशी अतिशय संतुलित कार्यकारिणी बनवण्यात आली आहे.
आगामी काळातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच जातीसमूहांना स्थान देण्यात आलेले आहे. महिला पदाधिकाऱ्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. नवतरुणांना संधी देत व सामाजिक समतोल राखून कार्यकारिणी बनलेली आढळून येते. कार्यकारिणीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली दिसून येते.
जिल्हा कार्यकारिणीमध्ये प्रामुख्याने सरचिटणीस पदी श्री ताराचंद गायकवाड, श्री हर्षवर्धन कराड, श्री रामेश्वर भादवे, सौ. छायाताई खाजेकर यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शहर जिल्हा सचिव म्हणून श्री प्रवीण कुलकर्णी, श्री सिद्धार्थ साळवे, श्री नितीन खरात, श्री प्रदीप बुरांडे, श्री नंदलाल गवळी, सौ. रूपाली वाहुळे, श्री विवेक राठोड, श्री अशोक जगधने, श्री सागर पाले, श्री अमित लोखंडे, श्री कल्याण धुळे, श्री अजय शिंदे, सौ. गीता आचार्य, सौ. मीना खरे यांना जिल्हा सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शहर जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून श्री संजय खंनाळे,
भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी श्री राहुल दांडगे तर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सौ. डॉ. उज्वला दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शहर जिल्हा अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांनी ही नियुक्ती केली असून, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, विधान परिषद आमदार श्री संजय केणेकर, आमदार सौ. अनुराधा चव्हाण तसेच माजी महापौर श्री भगवान घडामोडे यांनी अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या सह सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?






