भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर वाढदिवस साजरा करणार नाही, जनतेला केले आवाहन...!
 
                                 
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर वाढदिवस साजरा करणार नाही, जनतेला केले आवाहन...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.16(डि-24 न्यूज) राज्यात ओबीसी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. यामुळे अशा वातावरणात दोन्ही समाजात दरी निर्माण झाली आहे. काही जन सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मुद्दाम दोन समाजात तेढ निर्माण करुन काही जण आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. दोन समाज संघर्षाच्या रुपाने उभे असताना 17 जुलै 2024 रोजी माझा वाढदिवस उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही म्हणून हा वाढदिवस मी साजरा करणार नाही. शुभचिंतकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले तरी मला आनंद मिळणार नसल्याने कार्यक्रम आयोजित करु नये. त्यामुळे कृपया आपण कसलेच पुष्पगुच्छ, जाहिरात, होर्डिंग्ज, बॅनरबाजी न करता फक्त दुरध्वनी द्वारे मी आपल्या शुभेच्छा स्विकारेल सद्यस्थिती आपण दोन समाजातील द्वेषाचे वातावरण संपवण्याच्या कामाला लागूया व या महाराष्ट्रात विविध घटकांतील गोरगरीब, उपेक्षित, वंचित, दिनदलित कामगार माता भगिनिंसाठी महायुती सरकारने ज्या योजना सुरू केल्या ते योजना सामाजिक परिवर्तनासाठी घराघरापर्यंत, व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करावे हिच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पोहोचले समझावे असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी जनतेला केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            