भाजपाचे मंत्री विजय शहा विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी...
 
                                 
भाजपा मंत्री विजय शाहला मंत्रिमंडळातून बडतर्फ करून देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची काँग्रेसची मागणी...
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद),दि.14(डि-24 न्यूज)
भाजपाचे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह याने कर्नल सोफिया कूरेशी यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्या विरोधात आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले व भाजपा मंत्री विजय शाह ला मंत्रिमंडळातून बडतर्फ करून देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी शहर जिल्हाध्यक्ष शेख युुसूफ यांच्या नेतृत्वाखाली निवेदनात करण्यात आली.
यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शेख युसूफ, मनपाचे माजी सभापती इक्बालसिंग गिल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्या विभागाचे अध्यक्ष मोईन इनामदार, शेख अथर साहेबराव बनकर, शेख युनूस, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, डॉ. निलेश आंबेवाडीकर, शेख रईस, कैसर बाबा, अरुण शिरसाठ, मुज्जफर खान, शफिक शहा, बाबुराव कवसकर, संजय धर्मरक्षक, विनायक सरवदे, शेख कलीम, जावेद खान, शेख आजमत, शेख फय्याजोद्दीन यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हो
 
ते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            