भाजपाने ठोकला पश्चिम विधानसभा मतदारसंघावर दावा...!
भाजपने ठोकला पश्चिम विधानसभा मतदार संघावर दावा
भाजपने मतदार संघ सोडून घ्यावा: शहर सरचिटणीस जालिंदर शेंडगे
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) महायुतीतील घटक पक्ष भाजपच्या ताब्यात असलेल्या गंगापूर आणि फुलंब्री मतदार संघात लुडबुड करीत आहे या मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी करीत आहे एक प्रकारे ते युती धर्माला छेद देत आहे. वास्तविक पाहता पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी पूरक आहे भाजपला मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात आहे त्यामुळे भाजपने पश्चिम विधान मतदारसंघ लढवावा अशी मागणी भाजपचे शहर सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांनी भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यामार्फत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे दरम्यान भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने एक ठराव करून जालिंदर शेंडगे यांना पश्चिम मधून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे या संदर्भात बोलताना श्री.शेंडगे म्हणाले पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी खूपच अनुकूल आहे या मतदारसंघात भाजपचा परंपरागत मतदार आहे 2014 ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मधुकर सावंत यांचा अवघ्या 3500 मतांनी पराभव झाला तसेच 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार यांना 40 हजार मते मिळाली हा मतदार संघ परंपरागत हिंदुत्ववादी विचारसरणीला मानणारा आहे त्यामुळे या मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढविण्यास हवी यापूर्वी शिवसेनेचा उमेदवार भाजपच्या मतावरच निवडून आलाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संदिपान भुमरे यांना भाजपची मते मिळाल्याने त्यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी झाला आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपसाठी अनुकूल आहे त्यामुळे भाजपने हा मतदार संघ पक्षासाठी सोडवून घ्यावा पक्षाने उमेदवार दिल्यास मोठा मताधिक्याने भाजपचा उमेदवार निवडून येईल असेही ते म्हणाले दरम्यान भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने नुकताच एक ठराव पारित करण्यात आला त्यामध्ये या मतदारसंघातून विधानसभा प्रमुख जालिंदर शेंडगे यांना उमेदवारी द्यावी असा ठराव पारित करण्यात आला ठरावांमध्ये पुढे म्हटले आहे विधानसभा क्रमांक 108 पश्चिम विधानसभा हा मतदारसंघ परंपरागत भारतीय जनता पार्टीचा मतदार संघ आहे 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मते मिळाली अवघ्या काही मतांनी भाजप उमेदवारांचा पराभव झाला असला तरी आता चित्र पालटले आहे महायुतीतील घटक पक्ष भाजपचे आमदार असलेल्या गंगापूर आणि फुलंब्री या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची मोर्चे बांधणी करीत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर खुलताबाद मतदार संघातून निवडणूक लढवणारच असे जाहीर केले आहे तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषद चे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे व इतर नेते विधानसभा निवडणूक लढवण्याचे तयारी करीत आहे वास्तविक पाहता हे दोन्ही मतदार संघ भाजपचे आहे भाजपला डॅमेज करण्यासाठीच ही रणनीती आखली जात आहे त्यामुळेच छत्रपती संभाजी नगर पश्चिम मतदार संघात भाजपला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे त्यामुळे भाजपने या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असे मागणी आपण वरिष्ठ नेत्याकडे केल्याचे श्री.शेंडगे यांनी सांगितले दरम्यान भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने ठराव करून शहर सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांना या मतदारसंघातून निवडणूक द्यावी अशी मागणी केली आहे या ठरावात म्हटले आहे पश्चिम विधानसभा मतदार संघ हिंदुत्ववादी विचारसरणीला पूरक असा हा मतदारसंघ आहे त्यामुळे भाजपचे शहर सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांना या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी असा ठराव एका बैठकीत पारित करण्यात आला हा ठराव प्रसाद कोरके, बबन नरवडे, सुनील देहाडे, सचिन बारस्कर, योगेश धनके, उत्तम कांबळे, सुनील सूर्यवंशी, एडवोकेट गणेश मस्के यांनी मांडला त्यास भाजप अनुसूचित जाती मोर्च्याचे शहराध्यक्ष लक्ष्मण शिंदे, विजया भोसले, आशा जाधव, अश्विनी गायकवाड, ॲड. भालेराव, ॲड. साळवे, राजेश साळवे यांनी अनुमोदन दिले हा ठराव भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
What's Your Reaction?