भारतीय एकात्मता संघटनेचा प्रदीप जैस्वाल यांना पाठिंबा
भारतीय एकात्मता संघटनेचा प्रदीप जैस्वाल यांना जाहीर पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)
भारतीय एकात्मता संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी आज छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना त्यांच्या आगामी निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी संघटनेने प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांना संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले.
ऋषिकेश जैस्वाल यांच्याकडे संघटनेने हे पाठींबा पत्र दिले. प्रदीप जैस्वाल हे सर्व समाजाच्या हिताचे काम करत आले आहेत. आगामी काळात देखील ते समाजासाठी मोठे काम करतील अशी आशा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. भारतीय एकात्मता संघटनेने दिलेल्या पाठिंब्या बद्दल ऋषिकेश जैस्वाल यांनी संघटनेचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले, तसेच आपल्या सर्व समस्या आगामी काळात प्रदीप जैस्वाल साहेब सोडवतील, अशी खात्री त्यांनी दिली.
What's Your Reaction?