भारतीय दलित कोब्रा संघटनेने केली जोरदार निदर्शने...!

 0
भारतीय दलित कोब्रा संघटनेने केली जोरदार निदर्शने...!

भारतीय दलित कोब्रा संघटनेने केली जोरदार निदर्शने.... 

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.30 (डि-24 न्यूज) महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा कोसळला त्यास महायुती सरकार जबाबदार असून हे सरकार राज्यपालांनी तात्काळ बरखास्त करावे. या मागणीसाठी भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी वाजता रोकडिया हनुमान कॉलनी चौकातील संघटनेचे विभागीय कार्यालय येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नुकताच कोसळला आहे त्यास महाराष्ट्रातील महायुती सरकार जबाबदार आहेत. याशिवाय महाराष्ट्रामध्ये दोन वर्षाच्या कार्य काळामध्ये महिला वरील अत्याचार वाढले आहे. राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे या मागणीसाठी भारतीय दलित कोब्रा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. महायुती सरकार बरखास्त करावी या सरकारचे करायचे काय......., महायुती सरकार हाय हाय, बोल दलिता हल्लाबोल अशा गगनभेदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी हा परिसर दणाणून सोडला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परलाद त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अर्थ खात्याचे सचिव जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळास परवानगी देणाऱ्यांना बद्दल विभागाच्या सचिवावर गुन्हा दाखल करावे. पुतळा तयार करणारे आपटे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी. दोन वर्षात महिला व अत्याचार वाढले त्याची जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. राज्यपालांनी हे महायुती सरकार बरखास्त करावे आदी मागण्यासाठी ही निदर्शने करण्यात आले. यावेळी बोलताना अशोक दादा बोर्डे म्हणाले मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच पडला हे महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय लाजिरवाणी घटना आहे. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानच केला आहे. पुतळा उभारणीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार महायुती सरकारने केला त्यामुळेच महाराजांचा पुतळा पडला. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही. त्यामुळे हे सरकार राज्यपालांनी तात्काळ बरखास्त करावे. सबंधित अधिकारी कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी. तसेच भडकल गेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करण्यात यावी. स्मारकाचे काम करणारा ठेकेदार काम करण्यास लायक आहे की नाही हे तपासावे. महाराष्ट्रामध्ये दोन अतिशय गंभीर घटना घडल्या असताना महायुती सरकारने याप्रकरणी काही किरकोळ आरोपींना अटक केली मात्र बड्या माशांना सोडून देण्यात आले. अद्यापही ते फरार आहे. सत्ताधारी त्यांना पाठीशी घालत आहे त्यांना कोण पाठीशी घालत आहे त्याची चौकशी करण्यात यावी. अशोक दादा बोर्डे यांनी यावेळी उपस्थित केला निदर्शनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निदर्शनाचे नेतृत्व भारतीय दलित कोब्रा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोर्डे यांनी केले. निदर्शनामध्ये युवा नेते आनंद बोर्डे, सागर बोर्डे, सुमित्रा खंडारे, उषा वैष्णव, सुनिता चव्हाण, जयश्री मोदीराज यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय दलित कोब्रा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow