शहरातील 11120 घरकुल विक्रीसाठी ऑनलाईन सोडतसाठी लागला मुहुर्त
शहरातील घरकुलच्या लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन सोडत, सर्वात महाग घर हर्सुलला
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) - सन 2016 मध्ये शहरातील 60 हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात घरकुल बनवण्यासाठी जागा निश्चित केली. याठिकाणी बिल्डरांमार्फत 11120 सदनिका बणवले जाणार आहे यासाठी विक्रीची ऑनलाईन सोडत काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहे ते लाभार्थी या सोडत मध्ये सहभागी होणार आहे कोणाला या घराची लाॅटरी लागते व घरे बनण्यासाठी किती वर्ष लागणार याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. डोळ्यासमोर महापालिका निवडणूक आहे म्हणून तर हि सोडत काढण्यासाठी घाई केली जात आहे अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS) अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम 5000, अर्जाची किंमत 600+GST 108 एकूण 708 विनापरतावा).
पंतप्रधान आवास योजनेच्या अटी व शर्तीस अनुसरुन अर्ज पात्र झाल्यानंतर सदनिकेच्या विक्री किंमतीमधुन केंद्र व राज्य शासनाचे अनुदान वजा करण्यात येईल. अर्जदाराची वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाख पेक्षा जास्त नसावी.
नोंदणी व अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबी...
पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचा रद्द केलेला चेक अथवा पासबुकचे पहिले पान, मोबाईल नंबर ( आधारशी संलग्न), ई-मेल आयडी, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, अधिक माहितीसाठी संपर्क - PMAY लाॅटरी मदत केंद्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यालय - 43100.
सविस्तर जाहिरात, आरक्षण निहाय तपशील, माहिती पुस्तिका व ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता या https://housing.chhasambhanagarame.org संकेतस्थळावर भेट द्यावी. असे महापालिका आयुक्त जी.श्रीकांत यांच्या स्वाक्षरीने नमूद केले आहे.
कोणत्या ठिकाणी किती सदनिका व अंदाजित किंमत...
पडेगाव गट क्रं.69, 672 सदनिका, चटाई क्षेत्रफळ 29.98, किंमत 9.56,332,
सुंदरवाडी गट क्रं.9 व 10, 3288 सदनिका, किंमत 9,26,382, तिसगाव गट क्रं.225/1, 1976 सदनिका, किंमत 9,26,382, तिसगाव गट क्रं.227/1 , किंमत 9,44,370, हर्सुल गट क्रं.216, 504 सदनिका, किंमत 11,99,200 अंदाजे किंमत असणार आहे.
What's Your Reaction?