भारत देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी तयार राहा - केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड

भारत देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी तयार राहा
* केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत यांचे आवाहन
* लासुर स्टेशन येथे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचाराचा झंजावात औरंगाबाद,दि.6(डि-24 न्यूज) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश सुरक्षित झाला आहे. जागतिक पातळीवर आपण मानाचे स्थान मिळत आहोत. केंद्र राज्य सरकारच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचत असल्यामुळे आपल्या जीडीपी मध्ये भर होत आहे. येत्या काळात आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचा आहे त्यामुळे महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी येथे केले.
शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपबलिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), महाराष्ट्र नव निर्माण सेना, रासपा, प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांच्या प्रचारार्थ गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे सोमवारी दि. ६ मे रोजी सकाळी १० वाजता जाहीर सभा घेण्यात आली. या वेळेचे बोलत होते. व्यासपिठावर महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे, आमदार प्रशांत बंब, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर धनायत, राष्ट्रवादीचे सदाशिव गायके, तालुका अध्यक्ष अंकुश काळवने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप सिंग राजपूत, शिवसेना तालुका प्रमुख निरफळे, श्री गांधीले, कृउबाचे शेषराव जाधव, शिवसेना समन्वयक बाळासाहेब चव्हाण, प्रशांत बनसोडे, जे. बी. पवार, सविता सहाने आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री कराड म्हणाले, की २०१४ पूर्वी केंद्रात भ्रष्टाचार होत होता. आतंकवाद उफाळला होता. तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कमी केला. राम मंदिर बांधले, ३७० कलम हटविले. ट्रीपल तलाक रद्द केला. भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला. आज जागतिक पातळीवर अर्थ व्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. गरीबी दूर करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, महिलांचा सन्मान वाढविणे यासाठी मोदी यांनी प्रयत्न केले. ड्रोन दीदी, लखपती दीदी असे उपक्रम आणले. किसान सन्मान योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाते. पीक विमा योजना. शेतकऱ्यांसाठी नीम कोटेड युरिया आणला. ४००० कोटी रुपयांची जल जीवन मिशन योजना आणली. पूर्वीच्या खासदारांनी एकही काम नीट केले नाही. त्यामुळे आपला हक्काचा माणूस संदीपान भूमरे यांना निवडून द्यायचे आहे. महिलांना ३३ टक्के बिल आणल. त्याला मागच्या खासदारांनी विरोध केला. असा खासदार यावेळी निवडूण देऊ नका. आपल्या हक्काचा माणूस खासदार झाला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. यावेळी महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे म्हणाले , की आपला देश घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी धनुष्य बाणाला मतदान करा. आपल्या हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा. मतदारांचा उत्साह चांगला आहे. त्यांनी ठरवले आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे. महिलांच्या डोक्यावरचे भांडे उरवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस करीत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या प्रयत्नातून ३५० कोटी रुपये महिला बचत गटांसाठी आणल्या गेले. विरोधकांना प्रचाराचे मुद्दे नाहीत त्यामुळे ते वैयक्तिक टीका करण्यात व्यस्त आहेत. विकासाला मत द्या. तुमचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदीला म्हणजे विकासाला. देशाच्या विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी मला सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक सरपंच श्रीमती मिरा पांडव यांनी केले. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अंकुश काळवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी लासुर स्टेशनचे प्रसिद्ध व्यापारी दिगंबर पवार यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आभार हभप गावंदे महाराज यांनी मानले.
जिल्ह्याचे विकासासाठी बाणाला मत द्या- आमदार प्रशांत बंब
- पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात संदिपान भुमरे यांनी खेड्यापाड्यापर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक कामे केली. खऱ्या अर्थाने त्यांनी या खात्याला न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचे विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांना निवडून देण्यासाठी येत्या 13 तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबून भरघोस मत मिळवून द्यावे. शेतीवर काम केलं तरच आपले दारिद्य्र दूर होईल. केवळ आपण १८ टक्के काम करतोय. ते वाढविण्याची गरज आहे. H
गंगापूर तालुक्यात ३० हजार क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. येत्या काळात सव्वा लाख क्षेत्र ओलिताखाली आणायचे आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली जाणार आहे. आता जेसीबी महिला चालवतात. आमच्या मतदार संघात ही सुरुवात केली आहे. १० जेसीबी आणि ५० ट्रॅक्टर घेऊन हे काम भविष्यात केले जाणार आहे. पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात संदिपान भूमरे यांनी जिल्हा भारत विकासाची गंगा आणली आहे. रोजगार हमी योजना तळागाळापर्यंत पोहोचण्या साठी त्यांनी प्रयत्न केले. रस्ते, विहिरी, पेव्हर ब्लॉक, गाय गोठे आदींसह फळबागाच्या योजना, शेततळे खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले. जिल्हाभरात सुमारे ४५०० गोठे झाले. विकासात्मक दूरदृष्टी असणाऱ्या आपल्या हक्काच्या माणसाला दिल्लीत पाठवायचे आहे. त्यामुळे येत्या 13 तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबून गंगापूर - खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून त्यांना मताधिक्य मिळवून द्यायचे आहे.
What's Your Reaction?






