मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
मंत्री श्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन
22 संघांनी नोंदवला सहभाग
तीन दिवस रंगणार कब्बडीचा तरार....
औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शहरात नमो चषकच्या माध्यमातून विविध स्पर्धेंच आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा पूर्व मतदार संघाचे आमदार श्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
घे पंगा खेळाचा कर दंगा विजयाचा हे ब्रीद वाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या विविध खेळांचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. रविवारी पूर्व मतदार संघातील राजीव गांधी मैदानावर कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मंत्री सावे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी खेळाकडे देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. विविध खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना संधी मिळत असते. या संधी चा आपण सर्वांनी सदुपयोग करावे. तसेच मला खात्री आहे की पुढच्या वेळेस अशा खेळातून देशात चॅपियन तयार होतील. अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या स्पर्धेत ओपन आणि अंडर 14 तसेच 17 ची एकूण 22 मुलामुलींच्या संघांनी सहभाग नोंदवला असून पंच म्हणून पठाण सर, प्रशांत पांडे, वैभव सोनवणे, मोहित बोरकुळे, यांच्या सह 4 जणांनी पाहणी केली.
यावेळी युवा उद्योजक अजिंक्य सावे, किरण पाटील, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे, त्र्यंबक राजपूत, राहुल खरात, विजय पत्रिकर, बिपिन राठोड, यांच्या मोठ्या संख्येने खेळाडू, विद्यार्थी नागरिक तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?