मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपला ताफा रोखून अपघातग्रस्त जखमींच्या मदतीला धावून आले
मंत्री अब्दुल सत्तार यांनी ताफा रोखून अपघातग्रस्त जखमींच्या मदतीला धावून आले....
सिल्लोड,दि.24(डि-24 न्यूज) तालुक्यातील भराडी जवळील वडाळा गावानजीक आज ( दि.24 ) बुधवार रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. या घटनेतील जखमींना मंत्री अब्दुल सत्तार यांनी धावून येत मदत केली.
राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार आज तालुक्यातील अंभई येथील कार्यक्रमात जात असताना भराडी जवळील वडाळा गावानजीक नुकताच दोन दुचाकीमध्ये अपघात झाला होता. या अपघातात दोघे जण जखमी झाले होते.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवित तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी आपले कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या ताफ्यातील गाडी अपघातग्रस्ताला उपलब्ध करून देत तातडीने भराडी येथील रुग्णालयात पाठविले.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या स्वीय सहायकाना सूचना करत भराडी येथील डॉक्टरांना माहिती देऊन योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी घटनेतील जखमी झालेल्या अपघात ग्रस्तांची चौकशी केली. संजय पांडुरंग आहेर आणि साहेबराव बाबुराव शेळके अशी अपघातग्रस्तांची नावे असून ते सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथील रहिवासी आहेत.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपघातातील जखमींसोबत जिव्हाळ्याने संवाद साधत त्यांना धीर दिला. संजय पांडुरंग आहेर यांच्या डोक्यातून बरेच रक्त वाहत होते. त्या जखमी व्यक्तीच्या डोक्यात जखम झालेल्या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रुमाल बांधला.
अपघातातील जखमींना मंत्री अब्दुल सत्तार यांनी मदत केली. काही दिवसांपूर्वी मंत्री अब्दुल सत्तार अंधारी कडे जात असतांना कन्नड महामार्गावर बोरगाव जवळ असाच प्रकार घडला होता. तेव्हाही अब्दुल सत्तार यांनी एका अपघातग्रस्ताला तातडीने मदत केली होती. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने त्याला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले होते.
मंत्री अब्दुल सत्तार यांची कृतज्ञता सर्व परिचित आहे. गरजूंना किंबहुना संकटात सापडलेल्यांना मदत करणे हा अब्दुल सत्तार यांचा स्वभाव. आज वडाळा येथे घडलेल्या अपघातात मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेली मदत तसेच तातडीने उपचार मिळावा यासाठी त्यांची तळमळ पाहून अपघातग्रस्त भावून झाले होते.
What's Your Reaction?