मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

 0
मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, इम्तियाज जलिल यांची प्रतिक्रीया

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)-

सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस मिळाल्याचे जाहीर कार्यक्रमात त्यांनी कबूल केले. एम आय एम चे माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी मुंबईत आयकर विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली होती यानंतर हि नोटीस आल्याचे बोलले जात आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

संजय शिरसाट यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले काही लोकांनी तक्रार केली होती. तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली व 9 तारखेची वेळ दिली होती. आम्ही वेळ वाढवून मागितली आहे. आयकर विभागाला कायदेशीर उत्तर देवू असे शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

इम्तियाज जलिल यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले मी आयकर विभागाकडे तक्रार देवून पुरावे सुध्दा दिलेले आहे. संजय शिरसाट यांनी 2019 व 2024 विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्ती आणि मालमत्तेचा उल्लेख आहे. या दोन निवडणूकीत त्यांच्या संपत्तीत एवढी वाढ कशी झाली. ते वापरत असलेल्या कोट्यावधींच्या गाड्या, मालमत्ता खरेदी व्यवहारासाठी पैसे कोठून आले. लाचलुचपत विभागाकडे सुध्दा तक्रार दिली आहे. ईडीनेही माझ्याकडे पुरावे मागायला हवे मी देण्यास तयार आहे. विविध तपास एजन्सीने सुध्दा एक्शन घ्यायला हवे. उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे आहेत आपले काही होणार नाही या भ्रमात शिरसाट आहे हि लढाई अजून संपलेली नाही भ्रष्टाचार कोणी करत असेल तर लढत राहणार. आयकर विभागाची नोटीस शिरसाट यांना आल्याने शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. व्हिटस हाॅटेल प्रकरणात त्यांना हि नोटीस मिळाल्याचेही बोलले जात आहे. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत तसेच हे वक्तव्य माझ्यासाठीच असल्याचे हे शिरसाठ यांचे वक्तव्य चर्चेत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow