मतदान करुन या...दाढी कटींग मोफत, महीलांचाही होणार सन्मान

 0
मतदान करुन या...दाढी कटींग मोफत, महीलांचाही होणार सन्मान

मतदान करणाऱ्या दात्याची माणुसकी सलुन मध्ये मोफत दाढी कटिंग व महिलांचा सन्मान...

मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावे व मतदानाची 100% आकडेवारी वाढावी याकरिता सुमित पंडित ची धडपड

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज)

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा याकरीता सुमित पंडित गेल्या 15 दिवसांपासून चार्ली चाप्लीनच्या वेशभुषा करुन मतदान 100% व्हावे या करिता जनजागृती करित आहे आता शेवटच्या मतदानाच्या दिवशी त्याने आनोखी शक्कल लढवली आहे लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावे याकरिता त्याने आपल्या माणुसकी सलुन जटवाडा रोड येथे मतदात्यांची दाढी कटिंग मोफत व महिलांचा शाल श्रीफळ प्रशस्तिपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सुमित शासनाच्या खांद्याला खांदा लावून जनजागृतीचे कार्य अनेक वर्षापासून करीत आहे त्याने याआधी सुद्धा मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी मुलगी झाली कि पीत्यांची दाढी कटिग मोफत वृक्ष लागवड करणाऱ्या दात्यांची सलून सेवा मोफत, टॉयलेट भांडणाऱ्या दात्यांची सलून सेवा मोफत, सैनिकांची चांदिच्या वस्ताऱ्याने मोफत सलुन सेवा अशा विविध योजना सुमित राबवतो आहे. विशेष म्हणजे त्याच्या माणुसकी सलून मध्ये वाचनालय देखील आहे तरी शहरातील जास्तीत जास्त मतदात्यांनी मतदान करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान सुमित पंडित यांनी नागरिकांना केले आहे. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासुन सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान करुन यावे पत्ता जटवाडा रोड सारा वैभव समोर समाजसेवक सुमित पंडित 7588928822...!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow