मनपा प्रियदर्शनी विद्यालयात समर कॅम्पसमध्ये मल्लखांबाचे प्रशिक्षण

 0
मनपा प्रियदर्शनी विद्यालयात समर कॅम्पसमध्ये मल्लखांबाचे प्रशिक्षण

मनपा प्रियदर्शनी विद्यालयात समर कॅम्प मध्ये मल्लखांबाचे प्रशिक्षण...

औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या मनपा प्रियदर्शनी विद्यालयात आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे ,

शिक्षणाधिकारी भारत 

तीनगोटे ,मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१५ एप्रिल पासून समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

यात विद्यार्थ्यांच्या दररोज वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून घेण्यात येत आहे.

दररोज चित्रकला, हस्तकला , स्टोरी टेलिंग, विविध देशी खेळ, फ्लेमलेस कुकिंग, पुस्तक वाचन या प्रकारे उपक्रम राबविण्यात येत आहे.

 आज मनपा प्रियदर्शनी शाळेत विद्यार्थ्यांकडून मल्लखांब वर मनोरे उभारण्याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. 

 विद्यार्थ्यांना मल्लखाबंचे मार्गदर्शन प्रशांत जमदाडे व भरत पुसे हे करत आहे. शाळेमध्ये या प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम होत असल्यामुळे विद्यार्थी व पालक आनंदी आहेत

 या आनंदी वातावरणामुळे शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढत आहे.

 समर कॅम्प यशस्वी करण्याकरिता तेजस्विनी देसले, रश्मी होनमुटे ,मोनिका चव्हाण, वंदना पवार, मनीषा नगरकर, स्मिता मुळे ,संगीता चौधरी, किरण पवार,बी आर राठोड

हे परिश्रम घेत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow