मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची वंचितची मागणी...!

 0
मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची वंचितची मागणी...!

मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा... 

वंचित बहुजन आघाडीची विभागीय आयुक्तांकडे मागणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज विभागीय महसूल उपायुक्त रिता मेत्रेवार यांना जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेटून मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि मराठवाड्यातील सर्व छोट्या मोठ्या प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे. शेतकऱ्यांच्या खरीप मालाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे चालू करा 

अशी मागणी पक्षाच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली. 

मराठवाड्यातील चित्र अत्यंत गंभीर असून पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही जो थोडा फार पाऊस झाला होता त्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली,

परंतु मागील संपूर्ण एक दिड महिना कोरडा गेला असून त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले पिके धोक्यात आली असून खरीप हंगामातील पिके वाळून गेलेले आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक दृष्ट्या मोठ्या संकटात सापडला आहे.

सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी पडण्याची शक्यता हवामान विभाग दर्शवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत द्यावी मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शेतमजूर, भूमिहीन कुटुंबांना रोजगाराची व्यवस्था रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी,

तसेच मराठवाड्यातील सर्व तलावातील पाणीसाठा हा भविष्यातील पाणीटंचाईच्या अनुषंगाने आरक्षित करावा. शासनाने दुष्काळी परिस्थिती दखल घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात विभागीय आयुक्त यांना देण्यात आला असून सदरील निवेदन शासनाला पाठविण्यात येईल असे आश्वासन विभागीय महसूल उपायुक्त रिता मेत्रेवार यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी पच्छिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पुर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, जेष्ठ नेते माणिकराव करवजे, मिलिंद बोर्डे, अंजन साळवे, प्रविण हिवाळे, राजण किर्तने , सुरज मुळे पाटील, इजि एच एम इक्बाल, रामदास वाघमारे, शफीक ताजोदीन बागवान, बाबासाहेब खाडे सांडू श्रीखंडे, शेषराव निकाळजे, मुक्तार सय्यद, रवि रत्नपारखे, पैठण तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, सोयगाव तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, ता. निरीक्षक मनोहर जगताप, दिलीप सुरडकर, प्रकाश मिसाळे आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थि

त होते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow