मला त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात बांधू - पंकजा मुंडे
मला त्रास देणा-यांचे घर उन्हात बांधू- पंकजा मुंडे
भगवान बाबांचे दर्शन घेऊन दशहरा मेळावा सुरू, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित...भाजपा नेतृत्वाला दिले आव्हान...
बीड, सावरगांव(डि-24 न्यूज) माझ्यावर भगवान बाबांची सावली आहे. मला त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात असणार आहे. माझ्या सभेला राज्यातून सर्वच भागातील जनता आली आहे. आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर उन्हात बांधण्याचा संकल्प पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्यांच्या टिकेचा रोख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता असे बोलले जात आहे.
दरवर्षीप्रमाणे हजारोंच्या जनसभेला संबोधित करताना पंकजा म्हणाल्या माझ्या कारखान्यावर जेव्हा छापा पडला हेच लोक माझ्या मदतीला धावून आले त्यांनी अकरा कोटींचे चेक दिले हे आहे प्रेम, मी त्यांच्याकडे सतरंजी पण टाकू शकत नाही जेवू पण घालू शकत नाही. सभेला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उन्हात बसला आहे मी आणि व्यासपीठावरील मान्यवर सुध्दा उन्हात आहे. मला त्रास देणाऱ्याचे घरही उन्हात असणार आहे. आता मी तुमची ताई नाही आई आहे. माझ्यावर तुमची माझ्या घरची एकट्या लेकरा जवाबदारी आहे. मी उतरणार नाही, मातणार नाही. आणि घेतलेला वसा टाकणार नाही अशा शब्दांत आपले मत त्यांनी व्यक्त केले.
स्व.गोपिनाथ मुंडे यांची दसरा मेळाव्याची परंपरा कायम पंकजा मुंडे यांनी ठेवली.
अक्रामक होत आपल्या भाषण शैलीत त्या म्हणाल्या माझ्याकडे फक्त नीतिमत्ता आहे. कोण म्हणते मी या पक्षात चालले. त्या पक्षात चालले. त्रिदेवांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. आता आपल्याला देणा-याचे घर उन्हात बांधू. माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आता संयम नाही मैदानात उतरणार, प्रतमताई घरी बसतील तुम्ही लढा असे मुळीच चालणार नाही असा थेट इशारा त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाला दिला.
कोणतेही पद नसताना शिवशक्ती परिक्रमा काढली प्रत्येक ठिकाणी स्वागत झाले. पद असताना लोकांची अनेक कामे केली. पराभूत झाले तरी खचले नाही. तुमची सेवा करण्यात खंड पडला. यामुळे तुमची हात जोडून माफी मागते.
एखादी निवडणूक हरले तरी तुमच्या नजरेतून कधी उतरले नाही. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही अशी भावनिक साद पंकजांनी दिली. राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मराठा, ओबीसी आरक्षणाचा मोठा प्रश्न आहे. अपेक्षाभंगाचे दु:ख सहन करण्याची सहनशक्ती कोणत्याच समाजात नाही. शेतकरी सुखी, विमा मिळत नाही ,शेतमजूर, ऊसतोड कामगारांना पैसे वाढवून द्या अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केले.
What's Your Reaction?