महाराष्ट्रातील अदीबा अनमची युपिएससीत भरारी, राज्यातून पहिली मुस्लिम महिला आयएएस बणण्याचा बहुमान मिळाला...!

महाराष्ट्रातील अदीबा अनमची युपिएससी परीक्षेत भरारी... राज्यातील पहीली मुस्लिम आयएएस बणण्याचा बहुमान...
यवतमाळ, दि.22(डि-24 न्यूज) आज केंद्रीय लोकसेवा आयोगाचा ( UPSC 2024) अंतिम निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्याची अदिबा अनम अश्फाक अहमद ने संपूर्ण भारतातून 142 वी रँक प्राप्त केली आहे. यापूर्वी आदिबाने यूपीएससीची मुलाखत दिली होती, परंतु अंतिम निवड झाली नव्हती. पण या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झाली आहे. तिला IAS पोस्ट मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनली आहे.
आदिबा ही हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्था आणि नंतर जामीया निवासी प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी होती.
तिच्या या यशामुळे अनेक विद्यार्थिनींना प्रेरणा मिळेल. तिच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तीच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले व शुभेच्छा दिल्या जात आहे.
What's Your Reaction?






