नॅशनल हेराल्ड केसची कारवाई मुख्य मुद्द्यांपासून ध्यान हटवण्यासाठी - डॉ.अंशुल अवीजित
 
                                नॅशनल हेराल्ड केसची कारवाई मुख्य मुद्द्यांपासून ध्यान हटवण्यासाठी - डॉ.अंशुल अविजित
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज )
द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने खा.सोनिया गांधी व विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांच्यावर कारवाई करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अंशुल अविजीत यांची छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद .
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल केल्याने काँग्रेस भडकली आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्षाने मंगळवारी, दि. 22 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अंशुल अविजीत यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी खा.डॉ. कल्याण काळे, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांची प्रमुख उपस्तिथी होती.
यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अंशुल अविजीत यांनी आरोप केला की, केंद्रीय एजन्सीकडून त्यांच्या वरिष्ठ नेत्यांवर मोदी सरकारने सूडबुद्धीने आणि द्वेषपूर्ण राजकारणातून नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पद्धतीने जप्त केली आहे. याचप्रमाणे, काँग्रेस नेत्या आदरणीय श्रीमती सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व अन्य ज्येष्ठ नेत्यांविरोधात खोट्या प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल करून केंद्र सरकारने सत्तेचा उघड उघड गैरवापर केला आहे.
यावेळी खा.डॉ. कल्याण काळे, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ, माजी मंत्री अनिल पटेल, मा.आ.नामदेवराव पवार, किरण पाटील डोणगावकर, भास्कर घायवत, शेख अथर, अमेर अब्दुल सलीम, संघठन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, सागर नागरे, गौरव जैस्वाल, अतिश पितळे, कैसर बाबा, इक्बालसिंग गिल, मोहित जाधव, डॉ. पवन डोंगरे, अरुण शिरसाठ, रईस शेख, अनिता भंडारी, मुझ्झफर खान, योगेश थोरात, योगेश बहादुरे, शेख फय्याजोद्दीन यांच्यासह काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            