महाविकास आघाडीच्या वतीने क्रांतीचौकात केले मुक आंदोलन...!

 0
महाविकास आघाडीच्या वतीने क्रांतीचौकात केले मुक आंदोलन...!

महाविकास आघाडीने क्रांती चौकात बदलापुर घटनेच्या निषेधार्थ व्यक्त केला निषेध...

शांततेच्या मार्गाने राज्य सरकार विरुद्ध जनतेने संताप व्यक्त केला...

शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली भावना...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.24(डि-24 न्यूज)

महाविकास आघाडी संभाजीनगरच्या वतीने आज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत क्रांती चौक परिसरात बदलापूर येथे चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काळ्या फित्या बांधुन व काळे कपडे घालून निषेध व्यक्त करण्यात आला. शांततेच्या मार्गाने राज्य सरकार विरुद्ध जनतेने संताप व्यक्त केला असल्याची भावना शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी व्यक्त केली.

सदरील आंदोलनात कुठलीही घोषणाबाजी करण्यात आली नाही. मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष हातात निषेधाचे फलके घेऊन शांततेत उभे होते. मुक आंदोलन करून बदलापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच तोंडाला कळ्या पट्ट्या बांधून, हातात काळे फलक आणि काळे फुगे घेऊन राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर मूक पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. 

मुलींवर अत्याचाराच्या घटना होत असल्या तरी सरकार या गंभीर प्रश्नाबाबत गंभीर नाही. राज्यात सातत्याने महिला अत्याचारांच्या घटना घडत आहे. या सरकारच्या कार्यकाळात महिला अत्याचारांचे प्रमाण अधिक वाढले असून महायुती सरकार मोठ मोठाले कार्यक्रम करण्यातच व्यस्त असल्याची टीका अंबादास दानवे यांनी यावेळी केली. जनता उत्स्फूर्तपणे या निषेध आंदोलनात सहभागी झाली असून गावागावात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर आले असल्याची भावना दानवे यांनी यावेळी प्रकट केली.

याप्रसंगी शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन, महानगरप्रमुख राजू वैद्य,माजी आमदार नामदेवराव पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, काँग्रेस शहराध्यक्ष शेख युसूफ, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पाडूरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, किरण पाटील डोणगावकर, माजी उपमहापौर राजू शिंदे, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, संतोष जेजुरकर, अनिल पोलकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते अभय टाकसाळ, पवन डोंगरे, विजय वाघचौरे, विजय वाघमारे, अक्षय खेडकर, बाळासाहेब थोरात, मोहित जाधव, आशुतोष बनकर, आम्ही अब्दुल, डॉ. जफर अहमद खान, भाऊसाहेब जगताप, इक्बाल सिंग गिल, शेख अजहर, एम.एस.अझर, बाबुराव कासकर, शेख मुजम्मिल, कमलेश कामटे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, जयसिंग होलीये, पुरुषोत्तम पानपट, मनोज गांगवे, संतोष खेडकर, चंद्रकांत गवई, गोपाल कुलकर्णी, सुरेश गायके, बापू कवळे , कुणाल पाठक, सोमनाथ धायगुडे, 

मुश्ताक अहमद, मोहम्मद हबीब शेख,प्रशांत जगताप, अध्यक्ष मोहम्मद रजी, विठ्ठलराव जाधव,राजेश पवार, तय्यब खान, अय्यूब खान, जलील अहमद खान, अशरफ पठाण, शेख अलीम, शेख इरफान, रविंद्र तांगडे, आशिष पवार, अशोक बंसवाल, इम्रान उल हक, राजेंद्र दानवे, नंदू लबडे ,प्रमोद ठेंगडे, विशाल राऊत, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे व हनुमान शिंदे, महिला आघाडी सह संपर्क संघटक सुनिता देव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीक्षा पवार, शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मेहराज पटेल, दुर्गा भाटी, मीना फसाटे, अनिता मंत्री, आशाताई दातार, सुनिता सोनवणे, नलेनी महाजन, सुकन्या भोसले, मीना थोरवे, संध्या कोल्हे, सविता निगोळे, सारिका शर्मा, माधुरी देशमुख, सुनिता महाजन, सुनिता पाटील, नंदा काळविणे, रेखा फलके, प्रतिभा राजपूत, सुषमा यादगिरे, रंजना कोलते, विजया पवार, अरुणा पुणेकर, मंजुषाताई पवार, हेमा पाटील, शीला मगरे, अनिता भंडारी, धनश्री तळवळकर, दीपाली पाटील व रोहिणी पिंपळे उपस्थित होत्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow