माजीमंत्री राजेंद्रबाबू दर्डा राजकारणात होणार सक्रीय...?

 0
माजीमंत्री राजेंद्रबाबू दर्डा राजकारणात होणार सक्रीय...?

माजीमंत्री राजेंद्रबाबू दर्डा राजकारणात होणार सक्रीय...?

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात घवघवीत यश मिळवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत यश टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसची नजर सक्षम उमेदवार देण्यासाठी अधिक प्राधान्य देणार आहे. म्हणून उद्योगमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री पदावर काम करत असताना वेगळी छाप जोडणारे राजेंद्रबाबू दर्डा सक्रीय राजकारणात येण्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.जफर अहमद खान यांनी दिले आहे.

शहरातील तीन विधानसभा मतदारसंघाबाबत डि-24 न्यूजने त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी हि माहिती त्यांनी दिली. त्यांनी सांगितले औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड राहिला आहे. तीनदा राजेंद्र दर्डा शहरातून विधानसभेत निवडून दिले. शहरात अनेक ऐतिहासिक विकासकामे त्यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकारणात पाऊल ठेवले. या मतदारसंघातून मी सुद्धा इच्छुक आहे. पक्षाने अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी दिली तर येथे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. पक्षाने राजेंद्र दर्डा यांच्यासारख्या सक्षम उमेदवार या मतदारसंघातून दिला तर पुन्हा काँग्रेसला बळ मिळेल. राजेंद्र दर्डा यांना संधी मिळाली नाही तर मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी हायकमांडकडे करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी दिली नसल्याने नाराजी असल्याचे पक्षाला सांगितले. आगामी विधानसभा व विधानपरिषदेवर सक्षम मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून संकेत मिळत आहेत. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे घेण्याचीही मागणी केली आहे. तरीही राज्यात पक्षाकडून 288 जागेवर तयारी सुरू केली आहे. औरंगाबाद मध्य व पश्चिम मतदारसंघातून अनेक नेते इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow