मालमत्ता करात 10 टक्के सूटला 31 मे पर्यंत मुदतवाढ...!
मालमत्ता करात 10% सूटला 31 मे पर्यंत मुदत वाढ...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 30(डि-24 न्यूज)- महापौर समीर राजूरकर व आयुक्त अमोल येडगे यांच्या सुचने नुसार मालमत्ता करात एप्रिल महिन्यात 10% सूट मालमत्ता कराच्या सामान्य करात सूट देण्यात आली होती. या सूटचा फायदा घेत एप्रिल महिन्यात 31 हजार मालमत्ता धारकानी 29 कोटी 40 लाख कर भरणा केला. तर 3.82 लाख मालमत्तेचा भरणा केला.
शहरातील नागरिकांनी यांनी ही सूट आणखी वाढवल्यास कर भरणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल अशी विनंती महापौर समीर राजूरकर यांना केली होती त्यानुसार श्री राजूरकर यांनी ही मालमत्ता करातील 10% सूट 31 मे 2026 पर्यंत वाढवण्याच्या सूचना कर विभागाला दिल्या त्यानुसार ही 10% सूट आता 31 मे पर्यंत लागू असेल.
शहरातील सर्व कर दात्यांनी या सूट चा फायदा घ्यावा व कर भरणा करावा असे आवाहन महापौर समीर राजूरकर व उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केले आहे.
माझा कर माझी जबाबदारी ही मालमत्ता कर आकारणी मोहीम सध्या चालू असून यात कर आकारणी करणाऱ्या नागरिकांना ही मालमत्ता करात 10% सवलत देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व झोन कार्यालय येथे हेल्प डेस्क उभारण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्ता ना कर आकारनी करून शहर विकासात सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे.
What's Your Reaction?