मी गप्प बसणार नाही, झुकणार व विकणार नाही, आणखी घोटाळे काढणार - इम्तियाज जलिल
 
                                मी गप्प बसणार नाही, झुकणार व विकणार नाही, आणखी घोटाळे काढणार - इम्तियाज जलिल
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी बंदी असलेल्या शब्दाचा वापर पालकमंत्री संजय सिरसाठ यांच्यावर आरोप करताना केल्यानंतर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल असताना आतापर्यंत अटक का करण्यात आली नाही म्हणून आंबेडकरी समाज संतप्त झाला आहे. इम्तियाज जलिल यांना पोलिसांनी अटक करावी या मागणीसाठी डाॅ.आंबेडकर अत्याचार विरोधी कृती समीतीच्या वतीने क्रांतीचौक ते भडकलगेट पर्यंत आक्रोश मोर्चा काढला. यामुळे इम्तियाज जलिल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मोर्चाला उत्तर देताना पालकमंत्री संजय सिरसाठ यांच्यावर पत्रकार परिषदेत त्यांनी टिका केली. मोर्चा मागे संजय सिरसाठ आहेत. पैसे देऊन गोर गरीबांना 300 ते 500 रुपये देऊन बस व गाड्यांनी आणल्याचा आरोप त्यांनी केला. वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती दिली गेली शहरात मोठमोठे होर्डिंग लावले पैसे कोठून आले. भावना दुखावले खोटे बोलून गरीब जनतेला मोर्चात आणले होते. तसे काही नाही संजय सिरसाठ यांच्यावर केलेल्या आरोपांचा मुद्दा बाजूला करण्यासाठी मोर्चाचे राजकारण करण्यात आले. मी तो शब्द उच्चारुन समाजाचा अपमान केलेला नाही समाजासाठी राखीव असलेली दहा एकर जमीन आपल्या दोन मुलांच्या नावावर करुन घेत सिरसाटांनी गोरगरीबांची जमीन आपल्या खिशात टाकली. अनियमितता झाली तर प्रश्न उपस्थित करायचे नाही का...? हा मोर्चा सरकारच्या विरोधात काढायला हवे होते. मंत्र्यांची गुलामगिरीतून शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल केला. सिरसाठ मानहानिचा दावा न्यायालयात करत आहे त्यांनी आरोप चुकीचे असतील तर सिध्द करुन दाखवावे. पैसे भेटले तर हे लोक मंत्रालयापर्यंत मोर्चे काढतील. दलित चळवळीला न्याय हक्कासाठी लढण्याचा मोठा इतिहास आहे परंतु चळवळीत घाणेरडे राजकारण करणारे लोक आल्याने चळवळ बदनाम होत आहे. सात कोटींच्या फाईलवर समाज कल्याण(परिवार कल्याण) मंत्री यांनी सही करावी. ज्यांनी ते पैसे उचलले त्यांची चौकशी निघालेली आहे. त्या पैशांनी उद्योग तर उभारले नाही सुख चैन मध्ये उडवले. पैशांचा अपव्यय करणा-यांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस समाजकल्याण सचिवांनी केलेली आहे. महापालिकेच्या वतीने चालवली जाणारी रमाई घरकुल योजनेत सुध्दा अनियमितता करुन बोगस फाईल टाकून एका एका नेत्यांनी 500 प्रस्ताव सादर करुन एका लाभार्थ्याकडून एक ते दिड लाख रुपये गरीबांचे लाटले. ते प्रकरण सुध्दा बाहेर काढणार आहे. मनपा आयुक्तांनाही त्यांनी इशारा दिला आहे पालकमंत्र्यांची तक्रार सिबिआयकडे करु शकतो तर संबंधित मनपाच्या अधिका-यांचीही करणार आहे. अशा मोर्चाला घाबरणारा मी व्यक्ती नाही. ना झुकणार, ना विकणार, ना गप्प बसणार असा इशारा इम्तियाज जलिल यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            