मुंबई महापौर पद सर्वसाधारण महीलेसाठी, छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण, जालना एससी महीला...
मुंबई महापौर पद सर्वसाधारण महिला, छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण महीला-पुरुष, जालना एससी महीला
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - आज मुंबईत मंत्रालयात राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथे आता महीला राज पुन्हा येणार आहे. हे पद सर्वसाधारण महीलेसाठी असणार आहे. कोणत्या पक्षाचा महापौर होईल याकडे आता लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सर्वसाधारण महिला किंवा पुरुष साठी महापौर पद असणार असल्याने भाजपाचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे. पहील्यांदाच जालना महापालिका निवडणुक झाली येथे पहीला महापौर अनुसूचित जाती एससी महीला होणार आहे. येथेही भाजपाला बहुमत मिळाले आहे. पुणे सर्वसाधारण महीला, नागपूर सर्वसाधारण महिला, पिंपरी चिंचवड सर्वसाधारण महिला, पुरुष, ठाणे अनुसूचित जाती महीला किंवा पुरुष, नाशिक सर्वसाधारण महिला, कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती महीला, पुरुष, वसई विरार सर्वसाधारण महिला, पुरुष, सोलापूर सर्वसाधारण महिला, पुरुष, नवी मुंबई सर्वसाधारण महिला, मिरा भाईंदर सर्वसाधारण महिला, अमरावती सर्वसाधारण महिला, पुरुष, पनवेल ओबीसी (महीला, पुरुष), भिवंडी-निजामपूर सर्वसाधारण महिला, पुरुष, नांदेड वाघाळा सर्वसाधारण महिला, अकोला ओबीसी महीला, मालेगाव सर्वसाधारण महिला, कोल्हापूर ओबीसी (महीला, पुरुष), सांगली-मिरज-कुपवाड सर्वसाधारण खुला, जळगाव ओबीसी महीला, धुळे सर्वसाधारण महिला, उल्हासनगर ओबीसी (महीला, पुरुष), लातूर अनुसूचित जाती महीला, अहील्यानगर(अहमदनगर) ओबीसी महीला, चंद्रपूर ओबीसी महीला, परभणी सर्वसाधारण (महीला, पुरुष), इचलकरंजी ओबीसी(महीला, पुरुष), जालना अनुसूचित जाती एससी महीला महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
What's Your Reaction?