मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या शहरात
 
                                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या शहरात
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार दि.6 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार दि.6 रोजी दुपारी 1 वा. 15 औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे रवाना. दुपारी दीड वा. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचार प्रसार कार्यक्रमास उपस्थिती, स्थळः मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर. दुपारी साडेतीन वा. समृद्धी लॉन्स, हर्सूल सावंगी रोड कडे मोटारीने प्रयाण व 4 वा. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ, स्थळ- समृद्धी लॉन्स, हर्सूल सावंगी रोड. सायं.5 वा. मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण व सायं. साडेपाच वा. शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            