मुख्यमंत्र्यांची ओवीसींवर जहरी टिका, म्हणाले विजयाचा गुलाल उधळाल हिच छत्रपती संभाजी महाराज यांना श्रद्धांजली
 
                                विजयाचा गुलाल उधळाल हीच खरी छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिकांना आवाहन
औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) ज्या औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला. त्याच्या कबरीवर फुले उधळण्यास काही लोक जातात. ते नामांतराला विरोध करणारे लोक आपल्याला चालणार नाहीत. त्यामुळे 4 तारखेला याठिकाणी महायुतीच्या विजयाचा गुलाल उधळणे हीच खरी छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. काल ओवेसी यांनी इथे येऊन काही नारे दिले. राम मंदिराला विरोध केला. राम नवमीला येथे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या लोकांमध्ये दंगली घडविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओसीवीवर शाब्दिक हल्ला चढवला.
बाळासाहेबांनी या शहरावर जीवापाड प्रेम केले. त्यामुळे येथील मतदार शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. गेल्यावेळी गडबड झाली पण यावेळी आपल्या हक्काचा धनुष्यबाण निवडून द्यायचा आहे. तो धनुष्यबाण संदीपान भुमरे यांच्या हातात असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधले. 370 कलम हटवले. त्यालाही विरोध करण्यात आला. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे नकली हिंदुत्ववादी राम मंदिराच्या उद्धाटनाला गेले नाहीत. हेच का तुमचे राम प्रेम का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
ज्यांनी धर्मवीरांचा अतोनात छळ केला, त्यांच्या नांग्या ठेचून त्यांना त्यांची जागा दाखवा. आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. ज्यांनी मुंबईसाठी राज्यासाठी बलिदान दिले, त्या शहिदांचा अपमान काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे शहिदांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही मतदान करणार का असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
जे मुसलमान देशभक्त, राष्ट्रभक्त आहेत. डॉ.एपिजे अब्दुल कलाम राष्ट्रपती होते. बाळासाहेबांच्या काळात साबीर शेख मंत्री होते. हे देशभक्त मुसलमान आपले आहेत. पण इथे राहून पाकिस्तानची बोली बोलणारे मुसलमान आपले दुश्मन असल्याचे, मुख्यमंत्री म्हणाले.
उबाठाच्या काळात याकूब मेमनची कबर सजवण्याचे काम केले होते. आता त्यांना हिंदू म्हणण्याची लाज वाटत असल्याची टीका मु
 
 
ख्यमंत्री केली.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            