मुस्लिम बांधवांनी पाळला काळा दिवस, चंपाचौकात सामूहिक अजान संपन्न

 0
मुस्लिम बांधवांनी पाळला काळा दिवस, चंपाचौकात सामूहिक अजान संपन्न

मुस्लिम समाजाने पाळला काळा दिवस, चंपाचौकात सामूहिक अजान संपन्न

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) अयोध्या येथील बाबरी मस्जिद पाडल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला. दंडावर काळी पट्टी बांधून चंपाचौकात रजा अकादमीच्या वतीने सामूहिक अजान देण्यात आली. हाफिज आरीफ नूरी यांच्या मागे उपस्थितांनी अजान देत सामुहिक दुवा केली. चंपाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रसंगी रजा अकादमीचे मौलाना साजिद रजा, मोहंमद हुसेन रजवी, शाहनूरखान, येरोज रजा, जावेद कुरैशी, शाहनवाज खान, अब्दुल अजीम इन्कलाब आदी उपस्थित होते. देशात शांतता कायम राहावी, मुस्लिम समाजाला न्याय मिळावा, बाबरी मस्जिदचा इतिहास येणाऱ्या पिढीला स्मरणात राहावे यासाठी शांततेच्या वातावरण दरवर्षी रस्त्यावर अजान देण्याची हि परंपरा रजा अकादमीच्या वतीने कायम आहे असे यावेळी हाफीज आरीफ नुरी यांनी यावेळी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow