मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची जेष्ठ माजी नगरसेवकांची मागणी
मराठा आरक्षणाला पाठिंबा... मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा
औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची राज्यात आर्थिक सामाजिक परिस्थिती दयनिय आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांचा पाठिंबा आहे पण त्यासोबत राज्य सरकारने मुस्लिम समाजालाही शिक्षण व नोकरीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आज शहरातील जेष्ठ माजी नगरसेवक यांनी विभागीय आयुक्त यांना निवेदन सादर करुन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे रंगनाथ मिश्रा कमिशन व सच्चर कमिटीच्या अहवालानुसार हे आरक्षण मिळावे. मराठवाड्यातील शैक्षणिक, सामाजिक व माजी नगरसेवक यांनी हि मागणी केली आहे. मागिल सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने शैक्षणिक आरक्षण मान्य केले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी 95 हजार स्वातंत्र्य विरांनी बलिदान दिले शासकीय गैजेटमध्ये नोंद आहे. यामध्ये 61395 मुस्लिम स्वातंत्र्य विरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या परिवाराला आजपर्यंत ना पेंन्शन ना शासकीय लाभ मिळाला. त्यांना सुध्दा तातडीने न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्र समाजातील प्रमुख लोकप्रतिनिधी, जेष्ठ समाजसेवक, पालक, व शैक्षणिक संस्था या निवेदनाद्वारे देशाची घटना व आयोगाचे अहवाल सध्या अल्पसंख्याकांची व आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून मुस्लिम समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू राहणार असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माजी नगरसेवक मोहसीन अहेमद, माजी नगरसेवक मुश्ताक अहमद, शेख मुनाफ, एजाज अन्सारी, मसूद खान, फजलूल्लाह खान, आबेदा बेगम, सलमा बानो, सिद्दीकी नफीसा सुलताना, अब्दुल जलिल खान, अब्दुल नवीद रशिद यांच्या निवेदनात सही आहे.
What's Your Reaction?