मोईन इनामदार राष्ट्रवादीत, महापालिका निवडणुकीत होईल फायदा...!

 0
मोईन इनामदार राष्ट्रवादीत, महापालिका निवडणुकीत होईल फायदा...!

मोईन इनामदार राष्ट्रवादीत, महापालिका निवडणुकीत होईल फायदा...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- आंबेडकर नॅशनल काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मोईन इनामदार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. मोईन इनामदार यांचा जनसंपर्क, युवा चेहरा, उच्चशिक्षित असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला फायदा होईल अशी चर्चा शहरात आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले शहराचा पाणी प्रश्न, गुंठेवारी पासून सामान्य नागरिकांना सवलत व दिलासा, अतिक्रमण कारवाईत ज्यांची मालमत्ता बाधित झाली त्यांना नुकसानभरपाई मिळवून देणे, मुस्लिम अल्पसंख्याक प्रश्न सोडवणे, पक्ष संघटना मजबूत करणे, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे, पक्षाच्या वतीने घेण्यात आलेले जनहिताचे निर्णय जनतेमध्ये पोहचवणे यास प्राधान्य देणार आहे. 

यावेळी माजी नगरसेवक अजिज खान गणी खान, अबुबकर अमोदी, फजलुल्लाह खान, शेख अलिम, शेख महेमुद आदी उपस्थित होते. यावेळी अब्दुल अजिम कादरी, शेख इरफान यांनी पक्षात प्रवेश केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow