म्हाडाच्या वसाहतीच्या प्रश्नांवर महसूलमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक, संजय केनेकर यांचा पुढाकार...!

 0
म्हाडाच्या वसाहतीच्या प्रश्नांवर महसूलमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक, संजय केनेकर यांचा पुढाकार...!

म्हाडाच्या वसाहतीच्या प्रश्नांवर महसूलमंत्र्यांनी घेतली बैठक, केनेकरांचा पुढाकार...!

छत्रपती संभाजीनगर, दि.23(डि-24 न्यूज) - मुंबई येथे मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथील सिडको एन-7 म्हाडाच्या वसाहतीच्या प्रश्नांवर सविस्तर आढावा बैठक घेतली. घरधारकांचे प्रश्न सुटावे व त्यांना न्याय मिळावा यासाठी आमदार संजय केनेकर यांनी पुढाकार घेतला.

या बैठकीत म्हाडातील घर खरेदी प्रक्रीयेतम्यान मुल्यांकनातील फरकावर आकारण्यात आलेले मुद्रांक शुल्क रद्द करणे, लीज डीडचे नुतनीकरण, आकारण्यात आलेले मुद्रांक शुल्क व चौपट दंड माफ करणे. 10 टक्के विलंब शुल्क रद्द करणे. भुभाडे माफी तसेच रहिवाशांना घराच्या मालकी हक्क प्रदान करण्याबाबत सकारात्मक आणि सखोल चर्चा करण्यात आली. या सर्व विषयांवर तातडीने पुढील कार्यवाही व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट व आवश्यक सूचना देण्यात आल्या. अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांची महसूलमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतल्याने आमदार संजय केनेकर यांनी आभार मानले. या निर्णयांमुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow