युवतींनी सक्षम स्त्री होण्याबरोबरच माणूस म्हणून जगणे सक्षम करावे- अॅड वैशाली डोळस
युवतींनी सक्षम स्त्री होण्याबरोबरच माणूस म्हणून जगणे सक्षम करावे - ॲड. वैशाली डोळस
औरंगाबाद, दि.(डि-24 न्यूज) आज गांधी जयंती दिनी भारतीय महिला फेडरेशन तर्फे स्वामी विवेकानंद शाळा, गणेशनगर येथे युवतींसाठी प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शक ॲड. वैशाली डोळस पुढे म्हणाल्या की सद्ध्या टीव्ही वरील मालिका, मोबाईल, इंटरनेट मुळे महिलांना गुंगी चढली आहे, त्यांना मालिकेतले प्रश्न कळतात परंतु आपल्या आसपासच्या समाजातले प्रश्न कळत नाही. सरकारी शाळा बंद पडत आहेत, महागाई प्रचंड आहे, महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत मात्र महिला मेकअप, शॉपिंग आणि मोबाईल स्टेटस मधे गुंग आहेत, हे अत्यंत घातक आहे. यातून बाहेर पडण्यासाठी जिजाऊ-सावित्री-रमाई तसेच शिवराय-ज्योतिबा-बाबासाहेब यांच्या कर्तृत्वाचे वाचन केले पाहिजे. त्यांचा विचारच तुम्हाला सक्षम करेल आणि तुमच्या सोबत घडणाऱ्या अत्याचाराला विरोध करण्याची ताकद निर्माण करेल.
या शिबिराच्या उद्घाटन डॉ. मीना घुगे, दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे व डॉ राम बाहेती यांच्या हस्ते झाले. या वेळी कवयित्री आशा डांगे, कवयित्री डॉ सविता लोंढे व प्रा. भारत शिरसाट यांचीही उपस्थिती होती.
डॉ राम बाहेती यांनी तरुण मुलींच्या शिक्षण व नो टक्का वाढत आहे मात्र त्यांच्या समस्या ही वाढत आहेत, खडतर काळाला सामोरे जाण्यासाठी त्यांनी संघटित होणे गरजेचे आहे.
घुगे हॉस्पिटलच्या प्रसूतीतज्ञ डॉ मीना घुगे यांनी धावपळीच्या जीवनशैलीत तरुणींनी आरोग्य आणि आहाराची कशी काळजी कशी घ्यावी यावर सखोल मांडणी केली. निर्मला निंभोरे यांनी मुलीवरील वाढत्या छेडछाडीची कारणे व अनेक घटनांचा उलगडा केला. स्वामी विवेकानंद शाळेच्या मुख्याध्यापिका दीपमाला चव्हाण यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रा. भारत शिरसाट, श्री अमित कुलकर्णी, यांनी शुभेच्छा दिल्या. कॉ मधुकर खिल्लारे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहिर वसुधा कल्याणकर यांनी केले.
'युवती व सांस्कृतिक चळवळ' या विषया अंतर्गत कवयित्री आशा डांगे व कवयित्री डॉ सविता लोंढे यांनी समाजातील प्रश्नांचा अभ्यास करून आशयघन कविता रचना कशा कराव्या याचे मा्गदर्शन केले व स्त्री अत्याचारा वर परखड कवितांचं सादरीकरण केलं. तसेच शाहिर वसुधा कल्याणकर यांनी युवतींना चळवळीची गाणी शिकवली.
सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन, परिचय आणि आभार कावेरी दळवी, प्रतीक्षा पवार, निकीता चव्हाण यांनी केले. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन, परिचय आणि आभार अंकिता किर्तिशाही, आरती दांडगे, वैष्णवी सरोदे यांनी केले. शेवटच्या सत्राचे सूत्रसंचालन, परिचय आणि आभार शीतल खिल्लारे, निकिता वाघमोडे व आस्था विश्वकर्मा यांनी केले
तसेच शिबीर यशस्वी करण्यासाठी, वैष्णवी मरकड, चव्हाण, वैष्णवी जोजारे, वर्षा लोलूरे, प्रिती खरात, ईश्वरी म्हस्के, स्वाती प्रधान, सोनाली गायकवाड, आरती प्रधान, सुनीता गिरी, संध्या मोरे, शीतल हणमंते, सुजाता मोटे, पूजा हणमंते, गायत्री परांडे, आदिती झोडपे, पायल राठोड यांच्या सह अनेक महाविद्यालयीन युवती उपस्थित होत्या.
What's Your Reaction?