राष्ट्रीय डेंग्यू दिन विविध उपक्रमांनी साजरा, एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे नागरीकांना आवाहन
![राष्ट्रीय डेंग्यू दिन विविध उपक्रमांनी साजरा, एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे नागरीकांना आवाहन](https://d24news.in/uploads/images/202405/image_870x_66461da91f629.jpg)
राष्ट्रीय डेंग्यू दिन विविध उपक्रमांनी साजरा...
एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे नागरिकांना आवाहन...
आज 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिन...
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
या वर्षीचे राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे घोष वाक्य " समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा " हे आहे. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या अधिपत्याखाली मनपा सिडको एन-८ रुग्णालय येथे डेंग्यूबाबत जनजागरण हेतू डेंग्यू जनजागृती प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी हस्तपत्रिका वाटप करण्यात आल्या. डेंग्यू विषयक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात ५० ते ६० नागरिक उपस्थित होते. यामध्ये सहायक आरोग्य अधिकारी तथा जीवशास्त्रवेत्ता डॉ.अर्चना राणे, यांनी डेंग्यू आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती दिली. श्री. मिलिंद जबंगी, किटकसंमाहरक यांनी डासांच्या जीवन चक्राबाबत माहिती दिली व कोरडा दिवस पाळण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर डेंग्यू प्रतिज्ञा घेवून डॉ. मेघा जोगदंड, इंचार्ज आरोग्य अधिकारी, सिडको एन-०८ रुग्णालय यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अर्चना राणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा जीवशास्त्रवेत्ता, डॉ. मेघा जोगदंड आरोग्य अधिकारी, श्री. के बी मोरे आरोग्य पर्यवेक्षक, श्री. अतुल सुरडकर आरोग्य निरिक्षक, श्री. मिलिंद जबंगी किटकसंमाहरक, श्री. दिगंबर कोथळकर किटकसंमाहरक, श्री. शिवाजी गाडे एमपीडब्ल्यू, श्री. नंदकुमार झाडगे पर्यवेक्षक (प्र.) सिडको एन-०८ रुग्णालयातील सर्व स्टाफ व झोन क्र. ०५ चे सर्व मलेरिया कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
तसेच मनपाचे सर्व आरोग्य केंद्र व सर्व मलेरिया झोन क्र. ०१ ते १० मध्ये डेंग्यू प्रतिज्ञा घेवून डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली.अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ अर्चना राणे यांनी दिली आहे.
What's Your Reaction?
![like](https://d24news.in/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://d24news.in/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://d24news.in/assets/img/reactions/love.png)
![funny](https://d24news.in/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://d24news.in/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://d24news.in/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://d24news.in/assets/img/reactions/wow.png)