रिपाइं आठवले गटाला जिल्हा परिषद 5, महापालिका निवडणुकीत हवे 10 जागा
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रिपाइं महायुती सोबत लढणार- बाबुराव कदम
पक्षाला हव्यात जि.प.च्या 5 आणि महापालिकेच्या 10 जागा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महायुती सोबत लढणार असून कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महाड येथे होणारे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जिल्हा आढावा बैठक आज शनिवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते. या बैठकीला मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमल, रमेश दाभाडे, युवा जिल्हाध्यक्ष राकेश पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री.कदम म्हणाले नुकती छत्रपती संभाजीनगरामध्ये गायरान हक्क परिषद झाली या परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाने महायुती सोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 5 महानगरपालिकेच्या 10 जागा आणि पंचायत समितीच्या 10 जागा नगर परिषदेच्या योग्य त्या प्रमाणात रिपब्लिकन पार्टीला महायुतीने सोडाव्यात तशी मागणी महायुतीच्या नेत्यांकडे करण्यात येईल. पक्ष कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागावे. गाव पातळीवर जाऊन निवडणुकीची तयारी करावी. 3 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त महाड येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे संबोधित करणार आहे. याशिवाय कोकणातून अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरातून हजारो कार्यकर्ते महाडच्या अधिवेशनासाठी जाणार असल्याचे श्री.कदम यांनी सांगितले. या बैठकीला मनोज सरीन, किशोर साळवे, सतीश महापुरे श्री.अमराव, शरद शेगावकर, ज्ञानेश्वर खरात, सुनील अडसूळ, कृष्णा वाहुळ, विकास राऊत, विश्वजीत काळे, नितीन साळवे, प्रशांत वाहुळ, आनंद शिंदे, रवी बागुल, नितीन सूर्यवंशी, धम्मपाल सुरडकर, खुलताबाद तालुका अध्यक्ष फकीरराव भालेराव, कन्नड तालुका अध्यक्ष संदीप सातदिवे, वैजापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन, मिलिंद जाधव, बाळासाहेब सातदिवे, अरुण सातदिवे, संतोष साबळे, सुनील बोर्डे, अरुण दरेकर, समाधान शिरसाठ, डॉक्टर जयचंद कासलीवाल, अमोल कोतकर, सुखदेव जगताप, केके जगताप यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?