लाडक्या बहीणींची सुरक्षा पुरवण्यास सरकार घोर अपयशी, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची टिका
 
                                लाडक्या बहिणींची सुरक्षा पुरवण्यास सरकार घोर अपयशी...
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका...
आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवावा...
नवी पोलीस आयुक्तांना दिले निवेदन
नवी मुंबई, दि.29(डि-24 न्यूज ) लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजनांची घोषणा केली मात्र लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवण्यास हे सरकार घोर अपयशी ठरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
उरण येथील पीडितांच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,
शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले.
कोपरखैरणे येथील पीडित कुटुंबियांची दानवे यांनी भेट घेतली. या दोन्ही घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करीन, या कठीणप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत आहे, अशी ग्वाही दानवे यांनी कुटुंबियांना दिली.
उरण, कोपरखैरणे घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा
नवी मुंबईतील कोपरखैरणे, नेरुळ व उरण भागात महिला व तरुणीवर झालेल्या धक्कादायक घटनांमुळे समाजात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलगती न्यायालयात चालवून कुटुंबियांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना भेटून दिले.
यावेळी नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे
शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, उपनेत्या ज्योतीताई ठाकरे, उपनेत्या राजुल पटेल, उपनेत्या संजना घाडी, उपनेत्या शीतल देवरूखकर - शेठ, रेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सरचिटणीस रेखा ठाकरे उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            