लाल बावटा शेतमजूर व गायरान धारकांचे ऐन दिवाळीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिठलं भाकरी आंदोलन सुरू
लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने 300 गायरान धारक, शेतमजूरांचे ऐन दिवाळीत पिठलं भाकरी आंदोलन सुरू.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांची 25 जणांच्या शिष्टमंडळाशी चर्चा.
मुक्कामी आंदोलन सुरूच राहणार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- दुष्काळी मदत शेतमजूर व गायरान धारकांनाही प्रत्येकी 25 हजार द्या या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 4 नोव्हेंबर पासून ऐन दिवाळीत लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने चुली मांडून आंदोलन सुरू झाले आहे.
औरंगाबाद,गंगापूर, फुलंब्री,
सिल्लोड व सोयगाव या पाच तालुक्यातून आलेल्या सुमारे तीनशे जण यात सहभागी झाले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेतमजदूर युनियन (BKMU) शी संलग्न असलेल्या लाल बावटा शेतमजुर युनियनच्या वतीने जिल्हाभरातील गायरान धारक, शेतमजूर,रोहयो मजूर आदी ग्रामीण कष्टकऱ्यांचे हे आंदोलन राज्यभर एकाच दिवशी सुरू सुरू झाले आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांची 25 जणांच्या शिष्टमंडळाशी संध्याकाळी उशिरा चर्चा केली तरीही हे बेमुदत मुक्कामी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
दुपारी ज्याप्रमाणे कलेक्टर ऑफिस समोरच चुली मांडून तसेच भाकऱ्या थापून व पिठले शिजवून पंगती बसवण्यात आल्या त्याप्रमाणे रात्रीही पुन्हा चुली पेटवून स्वैंयपाक करण्यात आला व पंगती बसवून सुमारे अडीचशे जणांनी एकत्रित भोजन घेतले.
जिल्हाधिकारी विनय गौडा य
नी सर्व मागण्यांबाबत ऐकून घेतले.मंजुर घरकुलांना गाय रानात जागा देण्यात येईल हे त्यांनी मान्य केले.तसेच 1990 पूर्वीची अतिक्रमणाची प्रकरणे नक्की निकाली काढण्याचे आश्वासन दिले.मात्र यासंदर्भात लेखी पत्र मिळेपर्यंत तसेच
जोपर्यंत दुष्काळी मदत मिळत नाही तोपर्यंत सर्व आंदोलकांनी कलेक्टर कार्यालयासमोर मुक्काम करण्याचा मनोदय त्यांना बोलून दाखवला.
दुष्काळग्रस्त तालुक्यातील सर्व गावातील गायरानधारक, शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, ग्रामीण कष्टकरी, शेतमजूरांसाठी रोजगार हमीची व दुष्काळी कामे काढावीत,गायरान जमीनीच्या
पट्ट्याची मालकी द्यावी,
घरकुलाची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत, मायक्रो फायनान्सचा विळखा थांबवावा, सक्तीची कर्ज वसुली करणाऱ्यांना अटक करा आदी मागण्या या आंदोलनाद्वारे केल्या आहेत.
युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉ.राम बाहेती,
जिल्हा सचिव कॉ. गणेश कसबे, गंगापूर तालुका अध्यक्ष कॉ.हरिभाऊ हाटकर, तालुका सचिव कॉ.संजय तावरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सिल्लोड तालुका सचिव सय्यद अनिस, शेतमजूर युनियनचे फुलंब्री तालुका सचिव कॉ.बबन बोराडे, सिल्लोड तालुका सचिव मिर्झा अस्लम, उपाध्यक्ष कॉ.त्र्यंबक शेजवळ,
सोयगाव तालुका सचिव कॉ.प्रताप चव्हाण, कदीम शहापूर शाखा सचिव कॉ.पोपट कुर्हाडे,वाहेगाव शाखा सचिव रूखमणबाई श्रीखंडे,
गुरूधानोरा शाखा सचिव गणेश सुसे, शिल्लेगावचे रमेश कुकलारे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
असंघटित कामगारांचे नेते साथी सुभाष लोमटे,लाल निशाण पक्षाचे कॉ.भीमराव बनसोड, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अभय टाकसाळ आदींनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा देणारी भाषणे केली.एसएफआयचे लोकेश कांबळे, सत्यजित म्हस्के, अरविंद भुतकर,
एआयएसएफचे उमेश इंगळे यांनीही आंदोलनास सदिच्छा भेट दिली.
कानकबाई जाधव, इब्राहिम पटेल, रघुनाथ खंडागळे, नर्सिंग कोकाटे,मारीशा पवार, पुंजाराम कांबळे आदींसह पाच तालुक्यातील 250 भूमीहीन शेतमजूर रात्रभर
कलेक्टर ऑफिस समोरच झोपले.
What's Your Reaction?