वंचितच्या स्टार प्रचारकाच्या यादीत मुस्लिम नेते...!

 0
वंचितच्या स्टार प्रचारकाच्या यादीत मुस्लिम नेते...!

वंचितच्या स्टार प्रचारकाच्या यादीत मुस्लिम नेते...!

औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकाच्या यादीत मुस्लिम नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद येथील मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे अध्यक्ष जावेद कुरैशी, तय्यब जफर, नांदेड येथील फारुख अहमद आणि इम्तियाज नदाफ, दिशा शेख यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत दोन टप्प्याची निवडणूक झाली आहे आता महाराष्ट्रात अजून तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी 20 स्टार प्रचारक सभा गाजवत आहेत. 

यामध्ये वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, रेखा ठाकूर, धैर्यवर्धन पुंडकर, किसन चव्हाण, सोमनाथ साळुंके, गोविंद दळवी, दिशा शेख, निलेश विश्वकर्मा, राजेंद्र पातोडे, हेमराज उईके, अरुण जाधव, सुजात आंबेडकर, सिध्दार्थ मोकळे, अंजलिताई आंबेडकर, सर्वजित बनसोडे, अमित भुईगळ यांचा समावेश आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow