वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास प्रतिसाद
 
                                वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज शुक्रवारी उस्मानपुरा येथील गुरुगोविंद सिंग चौकात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला सायंकाळपर्यंत जवळपास 100 जणांनी रक्तदान केले या शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी से यांच्या हस्ते झाले. यावेळी पक्षाचे राज्य प्रवक्ते तयार तय्यब जफर, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, पश्चिमचे शहराध्यक्ष पंकज बनसोडे, शुभम मगरे, कृष्णा पाटील, शिवम भानुसे, राहुल पगारे, रवी रत्नपारखे यांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सायंकाळ पर्यंत जवळपास 100 जणांनी या शिबिरात रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमाला जोडूनच निवडणुका ईव्हीएम वर नको बॅलेट पेपरवर घ्या या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. शहरातील हजारो नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला.
 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            