वादळी वा-यात सिध्दार्थ गार्डन प्रवेशद्वाराचे छत कोसळले, दोन महीलांचा मृत्यू दोन जखमी

 0
वादळी वा-यात सिध्दार्थ गार्डन प्रवेशद्वाराचे छत कोसळले, दोन महीलांचा मृत्यू दोन जखमी

वादळी वा-यात सिध्दार्थ गार्डन प्रवेशद्वाराचे भींत कोसळली, दोन महीलांचा मृत्यू दोन जखमी

मृतकांच्या परिवाराला पाच लाखांची मदत, जखमींवर घाटीत उपचार सुरु, बीओटी तत्वावर दिले होते गार्डन, ठेकेदारावर होणार गुन्हा दाखल...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)

सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान सुसाट वादळ वारा सुटल्याने पळापळ सुरु झाली. शहरातील काहि घरांची व दुकानांच्या शेडचे पत्रे उडाले. महापालिकेच्या सिध्दार्थ गार्डनच्या मुख्य प्रवेशद्वाराची सुसाट वा-यामुळे भींत कोसळली

. यामध्ये दोन महीलांचा मृत्यू झाला आहे तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले आहे. स्वाती अमोल खैरनार, वय 37, रेखा हरिभाऊ गायकवाड, वय 60, राहणार टिव्ही सेंटर, छत्रपती संभाजिनगर यांचा या घटनेत दुर्देवी मृत्यू झाला आहे तर शेख अखिल, वय 27 हे जखमी झाले आहे.

घटनेची माहीती मिळताच मनपा आयुक्त जी श्रीकांत व पोलिस आयुक्त प्रविण पवार दाखल झाले. त्यांनी मृतक व जखमींच्या कुटुंबांची विचारपूस केली. पालकमंत्री संजय शिरसाट यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केले. मृतकांच्या कुटुंबाला पाच लाखांच्या मदत आयुक्तांनी जाहिर केली. घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. बीओटी तत्वावर सिध्दार्थ गार्डन देण्यात आले होते. प्रवेशद्वाराची देखभाल दुरुस्तीचे कामकाज ठेकेदाराकडे होते. या घटनेत दोन महीलांचा दुर्देवी मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. वादळी वा-यात शहरात काही ठिकाणी झाडे कोसळली. भगतसिंग नगर परिसरातील अंदाजे 19 वर्ष वयाच्या एक तरुणी रस्त्याने जात असताना साधारणता 50 वर्षे जुने कवठाचे झाडाची फांदी तरुणीवर पडल्याने डोळ्यासमोरील भाग पूर्ण फुटला असून ती गंभीर जखमी झाली आहे. त्या तरुणीला खाजगी एम्स हाॅस्पिटलमध्ये दाखल केले असल्याची माहिती परिसरातील नागरीकांनी दिली आहे. 

उस्मानपुरा, गोपाल टि, एन-9, एन-4, एअरपोर्ट, शिवशंकर काॅलनी, जालान नगर, बसैय्ये नगर, भगतसिंग नगर, कार्यकारी अभियंता पाटबंधारे संशोधन विभाग, कडा ऑफीस गजानन महाराज मंदीराजवळ या ठिकाणी झाडे कोसळली. अग्निशमन विभागामार्फत कार्यवाही सुरु आहे. 

मदतीसाठी अग्निशमन दलाला 30 हुन अधिक फोन काॅल आले. तात्काळ मदतीसाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतीसाठी धाव घेतली तर रस्त्यावर पडलेली झाडे बाजुला करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow