वाळूजच्या घटनेत 6 कामगारांचा मृत्यू, दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
वाळूजच्या घटनेत 6 कामगारांचा दुर्देवी मृत्यू, कंपनी मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
औरंगाबाद,दि.31(डि-24 न्यूज) वाळूज औद्योगिक वसाहतीतील हातमोजे बनविणाऱ्या सनशाईन इंटरप्राईजेस कंपनी मध्ये सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणी आपण सखोल चौकशी करावी अशा दुर्दैवी घटना घडत असताना कोणतेही सुरक्षेची काळजी घेत असल्याचे दिसत नाही. सदरील कंपनीत कामगार यांचा कोणत्याही प्रकारचा विमा नव्हता व शासनाच्या कोणत्याही नियम या कंपनीत पाळले गेले नाही असे निदर्शनास आले आहे या दुःखद घटनेत 6 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये दोषी असणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी व कामगार आयुक्त, कंपनी मालकासह ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कामगार यांच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्यात यावी या याविषयी कामगार नेते भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री संजय केणेकर यांनी पोलीस आयुक्त यांना भेटून तक्रार निवेदन दिले.
यावेळी श्री दीपक ढाकणे ,श्री संजय जोरले, श्री प्रदीप पाटील सोनवणे, श्री बाबुराव शेजुळ पाटील ,श्री रामेश्वर लांडगे, श्री अमोल पाटणी, श्री गणेश घुगे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?