मोदी शाहवर शरद पवारांची टिका, पुण्यात केलेल्या वक्तव्यावर दिले प्रत्यूत्तर
मोदी शहांना शरद पवारांचा टोला, म्हटले ज्यांना न्यायालयाने तडीपार केले ते देशाचे स्वरक्षण करत आहे
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.26(डि-24 न्यूज)
आठ दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवार यांच्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी टिका केली होती. ते म्हणाले होते भ्रष्टाचार करणाऱ्यांचे ते सुभेदार आहेत त्या टिकेला शरद पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या भाषणात मोदी आणि शाह यांच्यावर त्यांनी टिका केली. ज्यांना गुजरात दंगल प्रकरणी कोर्टाने त्यांना तडीपार केले त्या व्यक्तीवर आज देशाच्या स्वरक्षणाची जवाबदारी ते सांभाळत आहेत. या लोकांच्या हातात सरकार आहे हे लोक चुकीच्या दिशेने देशाला घेऊन जातील त्यामुळे प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज असल्याचे पवारांनी सांगितले.
माजी मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो हा धागा पकडत पवार म्हणाले एकदा मोदींनीही असेच म्हटले होते मात्र मला माझ्या बोटावर विश्वास आहे की ते कोणाच्या हातात दिले नाही.
शहरातील हज हाऊसच्या सभागृहात लेखक शेषराव चव्हाण लिखित डॉ.मगदूम फारुकी यांनी उर्दू भाषेत अनुवाद केलेले "पद्मश्री शरद पवार द ग्रेट इनिग्मा" या पुस्तकाचे विमोचन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आपल्या भाषणात ते बोलत होते.
कार्यक्रमात जेष्ठ उर्दू लेखक व प्रसिद्ध शायर डॉ.नुरुल हसनैन, एमजीएमचे सर्वेसर्वा अंकुशराव कदम, माजीमंत्री राजेश टोपे, डॉ.रशीद मदनी, पुस्तकाचे लेखक शेषराव चव्हाण, उर्दुत अनुवाद केलेले डॉ.मगदूम फारुकी, राष्ट्रवादीचे नेते इलियास किरमानी, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन व्यासपीठावर उपस्थित होते. सुत्रसंचलन खालेद सैफोद्दीन यांनी केले. आभारप्रदर्शन मौलाना इक्बाल अन्सारी यांनी केले.
पुस्तकाच्या बद्दल पवार म्हणाले या पुस्तकात मी घेतलेले अनेक उल्लेख आढळतात. हे पुस्तक माझ्या बद्दल होत आहे ते आज तुमच्या समोर ठेवण्याचे काम फारुख अब्दुल्ला करणार होते. माझ्याबद्दल येथे खूप काही चांगले बोलले गेले. हे पुस्तक दहा ते बारा वर्षांपूर्वी लिहिले आहे त्यांचे अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत आज या पुस्तकाचे उर्दू भाषेत अनुवाद केले. मला उर्दू येत नाही परंतु समजते. येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा आहे. आज जे घडत आहे ते लिहण्याची गरज आहे. एका प्रकारे संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्याचा निर्णय एक आव्हान होते तरीही निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर जाळपोळ सुरू झाली असे मॅसेज त्यावेळचे पोलिस आयुक्त करत होते. निर्णय बदलावा विरोध होत आहे असे त्यांनी सांगितले तरीही परिस्थिती हाताळली निर्णय बदलणे कठीण असते तो बदलला नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान लिहिले. त्यांच्या नावाने असलेले विद्यापीठ का नको. त्याला विरोध का...? त्यावेळी सक्तीचा निर्णय घेणे गरजेचे होते.
मी देशाचा स्वरक्षणमंत्री असताना अमेरिकेत गेलो.
मी विमानतळावरुन गेलो तेथे सैनिकांनी सॅलूट केले त्यामध्ये महीला सैनिक होते. तिथे सैनिकांची जवाबदारी महीलांकडे आहे मग भारतात का नाही. माझ्या मनात प्रश्न पडला. मी इथल्या अधिका-यांना म्हटले ते म्हणाले शक्य नाही. तीन बैठका घेतल्या त्यानंतर भारतीय सैनिकात महीलांना स्थान देण्याचा निर्णय घेतला. आज महीला यशस्वीपणे सैनिकांची जवाबदारी सांभाळत आहेत. त्याप्रमाणे महीलांना आरक्षणाचा निर्णय घेतला तोही योग्य ठरला. सर्व श्रेत्रात महीला योगदान देत आहे. गणेशोत्सव विसर्जन करायच्या दिवशी गृहमंत्री व अधिकारी रात्री झोपू शकत नाही. शांततेत विसर्जन व्हावे यामागचा उद्देश. मुख्यमंत्री असताना रात्री विसर्जनाच्या दिवशी रात्री चारपर्यंत जागलो. तो कोणीतरी दरवाजा वाजवला पुन्हा उठलो. लातूर जिल्ह्यातील किल्लारीत भुकंप झाला असल्याची माहिती अधिका-यांनी देताच विमानतळ गाठले. सकाळी लातूर पोहोचलो. हेलिकॉप्टरने किल्लारीत दाखल झाले तेव्हा तेथील बिकट परिस्थिती मन हेलावून टाकणारी होती. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. निराधारांना आसरा देण्यासाठी नियोजन केले. पंधरा दिवस तेथे ठाण मांडून बसलो. दोन वर्षांत दोन लाख घरे बांधून भुकंपग्रस्तांचे पुनर्वसन केले. समस्या सोडवण्याची तयारी असेल तर प्रश्न सुटतात हे या भुकंपाने शिकवले. बाॅम्ब स्फोट झाल्यानंतर मी टिव्हीवर आलो. मुंबई शहरातील मोहम्मद अली रोडवर अशी घटना घडली. बाजूच्या देशातून आरडिएक्स आले असेल शेजारील देशाची साजिश असेल. असे खोटे बोललो. दोन्ही समाजाला वाटले हि हिंदू मुस्लिम दंगल नसून काही वेगळा प्रकार आहे. यामुळे तेव्हा मुंबई शांत राहिली. अशी चालाखी पण करावी लागते असे पवार यांनी यावेळी मार्गदर्शन करताना घडलेले किस्से सांगितले.
जेव्हा देशाच्या कृषी मंत्र्यांचा पदभार घेतला तेव्हा कळाले देशात अन्नधान्याची कमतरता होणार आहे. अमेरिकेतून अन्नधान्य आयात करावे लागणार. देशावर उपासमारीची वेळ आली होती. कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन व शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बीज व रासायनिक खते उपलब्ध करून दिली. अन्नधान्याला चांगला भाव दिला. संशोधन करणाऱ्यांना पाठबळ दिले. आज जगात आपला देश गहू, तांदूळ उत्पादनात दुसऱ्या नंबरचा देश बनला. फळबागा मोठ्या प्रमाणात विकसित करण्यासाठी निर्णय घेतला. आज मोसंबी व विविध फळ उत्पादनात देश प्रगतीपथावर आहे. आज देशाची परिस्थिती बदलली. लोकसभा निवडणुकीत काय परिस्थिती होती. देशाचे पंतप्रधान व त्यांचे सहकारी प्रचारात काय बोलत होते. देशाची रक्षा यामुळे होत नाही. बंगरुळमध्ये सांगितले आम्हाला चारशे पार करायचे आहे. असे विधान भाजपाचे एका नेत्याने केले होते. त्यांना संविधान बदलण्यासाठी एवढे सदस्य लोकसभेत निवडून आणायचे होते. देशाचे संविधान देशाच्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार देते ते बदलणे लोकांना आवडले नाही. त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला आहे. असे पवारांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी काही नेत्यांनी भाषणे केली. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे इंडिया आघाडीला जनाधार दिला तसाच जनाधार आगामी विधानसभा निवडणुकीत द्यावे, अल्पसंख्याक समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी पुढे राहीले यापुढेही शरद पवारांनी आगामी काळात पुढाकार घ्यावा अशी मागणी यावेळी काही वक्त्यांनी केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समाजातील विद्वान, उच्चशिक्षित व विद्यार्थ्यीनी उपस्थित होते.
What's Your Reaction?