वाळूज पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेची मागणी...!

 0
वाळूज पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेची मागणी...!

वाळूज पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी; शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पोलिस आयुक्तांना निवेदन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 17 (डि-24 न्यूज) – वाळूज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानी कारभारामुळे आणि अरेरावीच्या वागणुकीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप करत शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वाळूज पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असून, यापूर्वी त्यांची बदली झाल्यानंतरही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची पुन्हा वाळूज येथे नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, पोलीस प्रशासनाविषयी नाराजी वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच त्यांची अन्यत्र बदली करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सलीम खांमगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ नागरे, जिल्हा उपाध्यक्ष हबीबभाई, शहराध्यक्ष युसूफ शाह आणि शहर सचिव सय्यद अली यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow