विजेच्या स्मार्ट मिटर बसवण्याच्या विरोधात माकपा रस्त्यावर, महावितरण कार्यालयासमोर केली निदर्शने

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी स. 10 वाजता एक तास आपल्या कष्टाची कमाई वाचवण्यासाठी द्या भाकपचे जनतेला आवाहन!
गुपचूप स्मार्ट लावणे बंद करा !
लावलेले मिटर काढून घ्या !
वीज दर कमी करा !
लोडशेडींग बंद करा !
या मागण्यांसाठी भाकप ची तीव्र निदर्शने !
दिनांक 2 जुलै 2025 बुधवार रोजी पुन्हा निदर्शने करणार !
छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5, कैलास नगर , दादा कॉलनी , भावसिंगपुरा , शंभूनगर व शहरातील इतर भागात गुपचूप व जबरदस्तीने लावलेले स्मार्ट तातडीने काढून घ्या व इतर ठिकाणी लावू नका, वीज दरवाढ कमी करा , लोडशेडींग बंद करा या मागण्यांसाठी भारतीय कम्यूनिस्ट पक्षातर्फे महावितरण च्या ज्युब्ली पार्क येथील सह व्यवस्थापकीय संचालक कार्यालयासमोर पुन्हा जोरदार निदर्शने करण्यात आली.
याबाबत असे की भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10 वाजता निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महिनाभर जनजागृती करायची आणि महिन्यानंतर निदर्शने करायची या पद्धतीने मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. वीज कायदा 2003 अंतर्गत कलम 47 (5) खाली अर्ज केल्यास स्मार्ट मीटर लावता येणार नाही अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियामध्ये जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत. त्यास बळी पडू नका. आंदोलनात या, आंदोलनात आला नाहीत आणि पैसे कमवण्यासाठी कितीही वेळ दिला तरी भरमसाठ वीज बिल भरण्यात तुमचे सर्व कमाई वाया जाईल असा इशाराही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जनतेला दिला आहे. पुढील निदर्शने 2 जुलै 2025 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता महावितरण कार्यालय जुबली पार्क, छत्रपती संभाजीनगर येथे जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहिल्यासच सरकारवर दबाव येऊ शकतो अन्यथा सध्या 11 रुपये 17 पैसे प्रति युनिट वीज बिल भरावे लागत आहे , स्मार्ट टी ओ डी मीटर युनिट लागल्यास 20 रुपये प्रति युनिट प्रमाणे घरगुती ग्राहकास वीज खरेदी करावी लागेल. व्यावसायिक ग्राहकास 20/- पेक्षा जास्त रक्कम आकारली जाईल, त्यामुळे जनतेला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. आज झालेल्या निदर्शनात दादा कॉलनी कैलास नगर तसेच शहरातील इतर भागातील नागरिक सहभागी झाले होते.
तिन - चार वर्षापूर्वी सरकारने नियोजीतपणे सरसकट सर्वांनाच चोर ठरवून विजेचे मिटर घरातून काढुन सार्वजनिक पोलवर रस्त्यावर लावून घेतले. गुपचुप स्मार्ट मिटर लावण्यासाठीचे सरकारचे ते भविष्यातील नियोजनच होते , हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. आता छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर , दादा कॉलनीचा काही भाग , भावसिंगपूरा, शंभूनगर व शहराच्या काही भागात गुपचुप स्मार्ट मिटर लावले जात आहेत. स्मार्ट मिटर लावण्यास कैलासनगर , दादा कॉलनी व भावसिंगपूरा व शहरातील इतर भागातील नागरीकांचा प्रचंड विरोध आहे. लोकांची परवानगी नसतांना अशाप्रकारे चलाखी करुन , गुपचुप तसेच अनेकांचे फॉल्टी मिटर नसतांना फॉल्टी मिटरच्या नावाखाली जुने मिटर घेवुन जायचे आणि बदमाशीने स्मार्ट मिटर लावायचे तसेच नविन कनेक्शन देत असतांनाही जबरदस्तीने जुन्या पध्दतीचे मिटर नाहीत , घ्यायचे असेल तर हेच घ्यावे लागेल अशी हुकुमशाही , जबरदस्ती करुन स्मार्ट मिटर जनतेला लुटण्यासाठी लावायचे हा प्रकार थांबला पाहीजे. ज्या ठिकाणी स्मार्ट मिटर लावले आहेत ते स्मार्ट मिटर काढुन पूर्वीचे मिटर लागले पाहीजे अन्यथा आपणास जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल . कैलासनगर , दादा कॉलनी , भावसिंगपूरा , शंभूनगर व शहरातील इतर भागात लावलेले स्मार्ट मिटर तातडीने काढून घ्या व पूर्वीचे जुने मिटर तात्काळ लावा , प्रचंड लुटमार करण्यासाठी मंजूर केलेले टीओडी पध्दतीचे वीज दर कायमचे रद्द करा व एप्रिल 2024 च्या दरापेक्षाही अर्ध्यापेक्षा कमी वीज दर करा , मुंबई पुण्याच्या लोकांना २४ तास वीज देता आणि वापर वाढला म्हणून उन्हाळयात मुद्दाम मराठवाडयाच्या लोकांना अघोषीत व बेमुदत लोड शेडींग करुन अतोनात त्रास देता हे बरोबर नाही. त्यामुळे हा भेदभाव लोकांच्या लक्षात आलेला आहे . लोडशेडींगमुळे घरातील वयोवृध्द , लहान मुले , महीला त्रस्त आहेत , व्यापारी व उद्योजक वैतागले आहेत , त्यामुळे लोडशेडींग तातडीने थांबली पाहीजे. मराठवाडयावरील अन्याय सहन केला जाणार नाही. वरील अन्याय तातडीने न थांबल्यास प्रत्येक महीन्याच्या पहील्या बुधवारी प्रचंड निदर्शने आपल्या कार्यालया समोर बेमुदतपणे करण्यात येतील. याची संपूर्ण जबाबदारी सरकार आणि आपल्या नाकर्तेपणाची असेल याची नोंद घ्यावी असे निवेदन देण्यात आले तसेच निवेदनात
छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर , दादा कॉलनी , शंभू नगर , भावसिंगपूरा व शहरातील इतर भागात गुपचुप व जबरदस्तीने लावलेले स्मार्ट मिटर तातडीने काढून घ्या व पूर्वीचे जुने मिटर तात्काळ लावा.
छत्रपती संभाजीनगरच्या लोकांची परवानगी नसतांना चलाखी करुन , गुपचुप तसेच अनेकांचे फॉल्टी मिटर नसतांना फॉल्टी मिटरच्या नावाखाली जुने मिटर घेवुन जायचे आणि बदमाशीने स्मार्ट मिटर लावायचे तसेच नविन कनेक्शन देत असतांनाही जबरदस्तीने जुन्या पध्दतीचे मिटर नाहीत असे सांगुन स्मार्ट मिटरच घ्यावे लागेले अशी हुकुमशाही , जबरदस्ती करुन स्मार्ट मिटर जनतेला लुटण्यासाठी लावायचे हा प्रकार थांबला पाहीजे व ज्या ठिकाणी अशा पध्दतीने स्मार्ट मिटर लावले आहेत ते तातडीने काढुन घेतले पाहीजे.
छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी कार्यालये व सरकारी निवासस्थानावर लावलेले स्मार्ट मिटरही तातडीने काढुन घेतले पाहीजे.
टीओडी पध्दतीची वीज नियामक आयोगांनी केस नंबर 217/2024 अंतर्गत मंजूर केलेली छुपी व प्रचंड प्रमाणातील वीज दरवाढ कायमची रद्द करा.
एप्रिल 2024 च्या वीजदरापेक्षाही अर्ध्यापेक्षा कमी वीज दर करा.
मराठवाडयावर अन्याय करणारी छत्रपती संभाजीनगरची भेदभाव पूर्ण लोड शेडींग बंद करा.
सेक्यूरिटी डिपॉझीटच्या नावाने करत असलेली लूट बंद करा.
स्मार्ट मीटरचे कंत्राट रद्द करा.
या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता ( प्रशासन ) राजेंद्र पी नाहटा यांनी निवेदन स्विकारले.
यावेळी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मोठ्या संख्येने पुन्हा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10 वाजता निदर्शने करण्यासाठी येणार आहोत हेही निक्षूण सांगण्यात आले. निदर्शनात मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हणजेच 2 जुलै 2025 सकाळी 10 वाजता ज्युबली पार्क येथील महावितरण कार्यालया समोर पुन्हा मोठ्या संख्येने निदर्शने करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले . यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य व शहर सेक्रेटरी ॲड . अभय टाकसाळ , कॉ. राजू हिवराळे कॉ रफीक बक्श , कॉ. मधूकर गायकवाड , कॉ अनंता कऱ्हाळे, कॉ. सय्यद मकसूद अली उर्फ मुन्नाभाई, किशोर हरिश्चंद्रे, आवेज शेख, सय्यद शौकत , समाजवादी पार्टीचे जेष्ठ नेते अयुब खान, मुमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शेख मोहसीन, शहर अध्यक्ष शेख मुख्तार , शेख खुर्रम, बाळासाहेब बनसोडे , प्रकाश बिराडे, अभिषेक जगताप , सुभाष साबळे, शिलाबाई मुजमुले, मनीषा हिवाळे, चारुशीला जावळे, जया शर्मा, अभिजीत बनसोडे , एजाज शेख, समाधान पारधे, शेख अफसर, शेख रफीक टेलर, फकीरचंद थोरात, निलेश दिवेकर , संतोष बिरारी , दीपक जाधव, गौतम शिरसाट , प्रमोद नाडे, आरिफ सय्यद, ऋषी रुपेकर ,रोहित इंगळे, नीलिमा भिंगारे, अजहर शेख, वच्छला वाघ, शांताबाई शिरमाळी ,जया तिवारी, जगन्नाथ तिवारी ,रेखा साळवे, भाऊ पठाडे, राजेंद्र उंटवाल, गौतम शिरसाट ,संतोष चौधरी,
यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते .
यावेळी मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर या संघटनेतर्फे स्मार्ट मीटर विरोधी आंदोलनाला पाठिंब्याचे पत्रही भाकपला देण्यात आले.
What's Your Reaction?






