विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त स्थानिक सुट्टी देण्याची मागणी

 0
विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त स्थानिक सुट्टी देण्याची मागणी

विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त स्थानिक सुट्टी देण्याची मागणी

औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) 14 जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त स्थानिक सुट्टी देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. 

14 जानेवारी 1994 रोजी विद्यापिठाचा नामविस्तार झाला तेव्हापासून हि मागणी केली जात आहे.

नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमतो व या आनंदोत्सवात सहभागी होतात. अनेक कार्यक्रम विद्यापीठ परिसरात आयोजित केले जातात. त्यात अनेक समाजांचे नागरिक, सामाजिक व राजकीय नेते सहभागी होतात. नामविस्तार दिनी जिल्हाधिकारी यांनी सुट्टी घोषित करावी. ज्यामुळे जनसामान्यांना ह्या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होता येईल प्रशासनाला व्यवस्थापन करायला सोईचे होईल.

निवृत्त पोलिस अधिकारी दौलतराव मोरे यांनी यावेळी मत व्यक्त केले की नामविस्तार दिनानिमित्त कायमस्वरूपी स्थानिक सुट्टी घोषित व्हावी जेणेकरून दरवर्षी निवेदन देण्याची वेळ येणार नाही. किमान यावर्षी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुट्टी घोषित करतील असा विश्वास जयेष तुषार मोरे यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दौलतराव मोरे, जयेष तुषार मोरे, प्रा.मनोहर लोंढे, राजु साबळे, संजय वाघमारे, विजय निकाळजे, विकास येडके, सचिन जैन, मंगेश मोरे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow