विरोधी पक्षातील नेत्यांच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
पोकळ घोषणांचा अतिरिक्त अर्थसंकल्प-
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे टीकास्त्र
मुंबई,दि.28(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
महायुती सरकारने राज्यातील जनतेसाठी
पोकळ घोषणांचा जुमलाबाज अतिरिक्त अर्थसंकल्प आज सादर केल्याची टीकास्त्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
सरकारने मूळ अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर केला. त्यावेळी अर्थसंकल्पात १३ हजार १८५ रुपयांची आर्थिक तूट दाखवली होती. गेल्यावेळी सरकारने पंचामृत
अर्थसंकल्प जाहीर केलं होतं, मात्र त्यातील एक थेंबही सरकारने राज्यातील जनतेच्या हाती दिले नसल्याची टीका दानवे यांनी केली.
रिक्षा चालक मंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास मंडळ आदी मंडळांची घोषणाही गेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र अद्याप एकाही मंडळाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. सरकारने आज अतिरिक्त अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा या
फसव्या असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली.
नमो योजनेचा पहिला हफ्ता केंद्र सरकारने दिला मात्र त्यानंतर एकही हफ्ता या सरकारने दिला नाही. आज सिंचन योजनेला नव्याने मान्यता दिली म्हणजे पहिलं काम केलं नाही. घरकुल योजनेच काम झालं नाही. सरकार
नवनवीन योजना आणून केवळ खोट्या घोषणांचा पाऊस पाडत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
सरकारच्या तिजीरोत एक आणा नाही, मला बाजीराव म्हणा,अशी सरकारची स्थिती असल्याची खरमरीत टीका दानवे यांनी केली.
अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया
आजचा अर्थसंकल्प म्हणजे
निवडणुकीआधीचं भलमोठं "गाजर"
आज सादर झालेला अर्थसंकल्प हा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेला नुसता भपका आहे.
शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी,युवक,महिला तसेच उद्योग, व्यापार,आरोग्य,पर्यटन अशा सर्वच क्षेत्रात आणि सर्वच स्तरावर निराशा देणारा अर्थसंकल्प आहे.
डॅा.जितेंद्र देहाडे
सरचिटणीस ।प्रदेश कॉंग्रेस
आजचा अर्थसंकल्प हा केंद्राच्या नेहमीच्या अर्थसंकल्पाची रि ओढणारा आहे फसव्या घोषणा मोठमोठे आश्वासन आणि जनतेच्या पदरात निराशे शिवाय काही मिळणार नाही. घोषणा करत असताना वीज बिलामध्ये माफी त्याचबरोबर वीज जोडणी करण्याचे आश्वासन दिले आहेत. महाराष्ट्र राज्यांमध्ये विजेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा असताना वीज बिल माफी आणि जोडण्याकरण्यापेक्षा वीजनिर्मितीवर लक्ष देणं जास्त गरजेचं होतं त्याचप्रमाणे लाडली बहिना नावाची नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. केंद्र शासनाने सुरुवातीच्या काळामध्ये पंधरा लाख रुपये मोफत देण्याच्या कबूल केलं होतं 15 लाखापासून ही मंडळी आता पंधराशे रुपये पर्यंत आलेली आहे ही योजना दोन-तीन महिन्याचा कार्यकाळ फार फारच चालेल नंतर ही योजना देखील गुंडाळली जाईल. दुध उत्पादन शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान हे पूर्वीपासूनच मिळत आलेले आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यापासूनच मिळत आलेला आहे ते फक्त सुरू राहिला त्यामुळे ही योजना काही नवीन नाही. अशाच पद्धतीच्या अनेक जुन्या योजनांना मुलावा देऊन त्या योजना आम्ही मांडल्या अशा पद्धतीचे चित्र निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न शासन करत आहे. युवक असतील पर्यटन असेल शिक्षण असेल आरोग्य असेल याच्यात कुठलीही भरीव तरतूद न करता हा फक्त घोषणाबाजीचा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचे येत्या निवडणुकीमध्ये निश्चित वाईट परिणाम या राज्य सरकारला भोगावे लागतील.
रेणुकादास (राजू) वैद्य
शिवसेना(उबाठा) महानगरप्रमुख छत्रपती संभाजीनगर
What's Your Reaction?