विशालगडाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी एमआयएमने केले विशाल आंदोलन...!

 0
विशालगडाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी एमआयएमने केले विशाल आंदोलन...!

विशालगडाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी एमआयएमचे दिल्लीगेटवर विशाल आंदोलन...!

शांततेत झाले आंदोलन, इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त यांना दिले शिष्टमंडळाने निवेदन...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.19(डि-24 न्यूज) कोल्हापूर, विशालगड येथे घडलेल्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी दिल्लीगेट येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दुपारी तीन वाजता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली दोन तास निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी हातात पोस्टर हातात घेऊन सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी इम्तियाज जलील व एमआयएमचे प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. आंदोलन सुरू असताना दिल्लीगेट रस्ता दोन्ही बाजूने वाहतूकीसाठी बंद करून वाहतूक टिव्ही सेंटर कडे वळवण्यात आली. पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. बॅरीकेट लावून वाहतूक वळविण्यात आली. आंदोलन शांततेत पार पडले. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे विशालगड येथे घडलेल्या घटनेतील आरोपिंवर हल्लेखोरांवर युएपिए कायदे अंतर्गत कारवाई करण्यात यावी. संबंधित निष्क्रीय व कर्तव्यात कसूर करणारे जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. झालेल्या हल्ल्यामागे धार्मिक स्थळे व मुस्लिम समाजाचे घराची शासनाने नुकसानभरपाई द्यावी. जखमींना पाच लाख रुपये सरकारने द्यावे. मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे त्वरित विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ पारित करण्यात यावे. या सर्व घटनेची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मार्फत करण्यात यावी. या मागणीचे निवेदन राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले. 

यावेळी आंदोलनात अब्दुल कवी फलाही, इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी, माजी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, नासेर सिद्दीकी यांची भाषणे झाली

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow