वैजापूर येथे मद्यसाठा जप्त...!

 0
वैजापूर येथे मद्यसाठा जप्त...!

वैजापूर येथे मद्य साठा जप्त...

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) गुप्त माहितीनुसार वैजापूर शहरातील रोटेगाव रोड लगत असेल्या एका हॉटेलवर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 112- वैजापूर विधानसभा मतदार संघ तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच फिरते भरारी पथक क्र. 01 यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 11.24 लिटर इतके विदेशी मद्य आढळुन आले आहे. ज्याचे अंदाजे बाजार मूल्य 12000/- इतके आहे. सदर कारवाई श्री. डॉ. अरुण जऱ्हाड सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 112 वैजापूर व श्री. सुनील सावंत तहसिलदार वैजापूर तसेच श्री. वाय डी रामकोर पथक प्रमुख, श्री. एस डी गायकवाड सहा. पथक प्रमुख, श्री. जी आर थोरात पो. हे. का. 302 व राज्य उत्पादन शुल्क वैजापूर विभाग येथील श्री. जी एस उंडे दुय्यम निरीक्षक ड-1, श्री. व्ही एस पवार, श्री. एस एम कादरी, श्री. एस जी मोपडे यांचा सहभाग होता. कारवाईतील मुद्देमाल जप्त केला असून आचार संहिता कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यांना अवगत केलेले असून पुढील कारवाई सुरु आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow