शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - बाळासाहेब थोरात
 
                                शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - बाळासाहेब थोरात
जटवाडा, एकतानगर, चेतनानगर, राजनगर भागात पदयात्रा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) महाविकास आघाडी सरकाने अडीच वर्षात अनेक लोकोपयोगी कामे केली आहे. कोरोनाच्या संकटात केलेल्या कामाची दखल जगाने घेतली. उर्वरित विकामकामे आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला साथ द्या. सर्वसामान्य नागरिकांना आमदार करा, असे आवाहन मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी केले.
जटवाडा, एकतानगर, चेतनानगर, राजनगर भागात पदयात्रा काढण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
पदयात्रेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्रीरंग आमटे पाटील, शिवसेना उपशहरप्रमुख संजय हरणे, संदेश कवडे, मिथुन व्यास, युवासेना शहर चिटणीस नागेश थोरात, कॉलेजकक्ष अधिकारी अभिजित थोरात, मधुर चव्हाण, खुशाल हरणे, चंदू सुरे, माजी नगरसेवक बन्सीमामा जाधव, रुपचंद वाघमारे, विभागप्रमुख सुरेश फसाटे, अशोक पालवे, संतोष सूर्यवंशी, माधव बुधवारे, सुनील वाकडे,सागर वाघ, विजय तांदळे, सोनाजी गायकवाड, विशाल भालेराव, आजेश दाभाडे, महिला आघाडी महानगरप्रमुख मीना फसाटे, पुष्पा नलावडे, प्रतिभा राजपूत, विना सहकारी सोसायटीचे चेयरमन साळुंके पाटील, महात्मा फुले सोसायटीचे थोरात, गंगावणे, सोनवणे, साळवे, घाटे काका, नरवडे, भगुरे, सारा वैभव सोसायटीचे पवार, अशोक हिवराळे, चांडंक, देशमुख आदिसह नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            