शहरातील धोकादायक इमारतीमधील तीन दुकाने सील...!
धोकादायक इमारतीमधील तीन दुकाने सील...
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.4(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने शहरातील धोकादायक इमारतीवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे व उप आयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय कार्यालय २ अंतर्गत पानदरीबा येथील सूर्यकांत गोसावी यांच्या धोकादायक इमारतीतील तळमजल्यावरील ३ दुकाने सील करण्यात आले.सदर इमारतीचा पहिला मजला पूर्णपणे जीर्ण व मोडकळीस आलेला होता यामुळे तळमजल्यावरील दुकानांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पहिला मजला पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता.
परंतु तळमजल्यावरील भाडेकरू समाधान स्टील, सिटिझन स्टील व विशाल भांडी भांडार यांनी महानगरपालिकेने दुकाने खाली करणेसाठी वारंवार नोटिसा देऊन सुध्दा आपले दुकाने रिकामे न केल्यामुळे आज महानगरपालिकेच्या वतीने सदरील तीन दुकाने सील करण्यात आले. सदर कारवाई पद निर्देशित अधिकारी रमेश मोरे, इमारत निरीक्षक रामेश्वर सुरासे, मजूर जनार्दन जाधव यांनी पार पाडली.
What's Your Reaction?