शहरात घरफोड्या, चोरीच्या घटनेत वाढ, नविन वर्षात गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान
शहरात घरफोड्या, चोऱ्यांच्या गुन्ह्यात वाढ, वर्षभरात 29 खूनाच्या घटना...107 गुन्ह्यात खूनाचा प्रयत्न, नवीन वर्षात वाढत असलेले गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान....
पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पत्रकार परिषदेत मांडला लेखाजोखा
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) वर्ष 2023 चा आढावा घेतला असता शहरात गुन्हेगारी वाढली आहे. घरफोड्या व चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. तर चोरीला गेलेला मुद्देमाल फिर्यादींना परत मिळवून देण्यासाठी काही प्रमाणात अपयश आले आहे. वर्षभरात शहरात 29 खूनाच्या घटना घडले आहे आरोपींना पकडण्यात शहर पोलिसांना यश आले तर खूनाचा प्रयत्न करणाऱ्या 107 घटना घडल्या यामध्ये काही आरोपींना पकडण्यात यश आले नाही. बलात्काराच्या घटनेत वाढ दिसून येत आहे. 102 घटनेतून 101 घटना उघड केले आहे. दरोड्याच्या 11 घटना घडल्या. जबरी चोरीच्या 184 घटना घडल्या तर यामधून 138 घटना उघड झाले आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल काही घटनेत जप्त करण्यात यश मिळाले नाही.
शहरात मागील वर्षभरात घडलेल्या गुन्ह्याचा आढावा बुधवारी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सादर केला. पोलीस प्रशासनाच्या यशाचा आलेख मांडतानाच त्यांनी आम्ही कुठे कमी पडलोय, यावर भाष्य केले. चोऱ्या आणि घरफोड्यांच्या गुन्ह्यात डिटेक्शनचे प्रमाण कमी असल्याची कबुली देत, आमचे अधिकारी निश्चितच त्यात सुधारना करतील, असा विश्वास पोलीस आयुक्त यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षभरात घडलेले गुन्हे, केलेल्या कारवाया, पकडलेले आरोपी, आरोपींचा शोध घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला गेला आणि सर्वसामान्यांचा चोरी गेलेला मुद्देमाल परत करून त्यांच्यामध्ये पोलीसांची प्रतिमा उजळवण्याचे केलेले प्रयत्न असा एकूणच वार्षिक लेखाजोखा बुधवारी पोलीस आयुक्तांनी मांडला. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. गुन्ह्याचा तपास करून आरोपीला शिक्षेचे प्रमाण 13 टक्क्यावरून 19 टक्यावर गेल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, नवनीत कावत, अपर्णा गिते, शिलवंत नांदेडकर उपस्थित होते.
नशा मुक्तीसाठी सामाजिक संस्थांची मदत...
60 तरुणांना केले व्यसनापासून मुक्त..
नशेच्या गोळ्या तसेच गांजा व इतर ड्रग्ज आदींविरोधात कारवाया करत असतानाच, पोलीस प्रशासन सामाजिक बांधिलकीही जपत असल्याचे दिसून आले. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना सामाजिक संस्थांची मदत घेऊन त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहितीही आयुक्त लोहिया यांनी यावेळी दिली. पयामे इन्सानियतच्या मदतीने मोहल्ल्यांमध्ये प्रबोधनही सुरू करून 50 ते 60 तरुणांना यातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यासाठी जेष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अजिज कादरी हे जनजागृती व उपचार कामी मदत करत असल्याचेही पोलीस आयुक्त म्हणाले.
10 पोलीस ठाणे भाड्याच्या जागेत इमारतीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर
शहराचा वाढलेला विस्तार पाहता, आणखी एक झोन वाढविणे, शेंद्रा येथे नवीन पोलीस ठाणे, वाहनचालकांसह मनुष्यबळ वाढविणे, तसेच पोलीस ठाण्यांसाठी जागा आणि इमारतीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. शहरातील 17 पैकी 10 पोलीस ठाणे हे भाडेतत्वावरील जागेत असल्याचे त्यांनी सांगितले.
ड्रोन पेट्रोलिंगचा मानस...
मनपा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ड्रोन पेट्रोलिंग सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी महानगरपालिकेला प्रस्तावही सादर केला असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
वर्ष 2023, 20 डिसेंबर पर्यंत शहरात 29 खून झाले असून, हे सर्व गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. मागील दोन वर्षातील खुनाच्या घटना पाहता, यंदा खुनाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. तर घरफोडीच्या 140 घटनांपैकी 42 घटनांमध्ये आरोपी पकडण्यात यश आले आहे. 140 पैकी 32 घटना या दिवसा घडल्या आहेत. दरोड्याचे सर्व 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर जबरी चोरीच्या 184 गुन्हे दाखल असून, 138 गुन्ह्यात आरोपी अटक करण्यात आले. मात्र 140 घरफोडीच्या गुन्ह्यापैकी 42 गुन्ह्यात आणि मोटार वाहन चोरीच्या 896 पैकी 285 गुन्ह्यात पोलीसांना आरोपी शोधण्यात यश आले आहे.
मंगळसूत्र चोरीच्या 57 घटनेतून 31 उघड झाले आहे. मोबाईल चोरीच्या 118 घटना घडल्या यामधून 39 उघडकीस आले. एमपिडिएच्या 18 कार्यवाही करण्यात आली.
सायबर पोलिस ठाणे एकूण गुन्हे 9 दाखल, 4 उघडकीस आले तर 8 आरोपी पकडले. सायबर पोलिस ठाण्यात एकूण 3838 तक्रारी अर्ज दाखल,1936 तक्रारी प्रलंबित आहेत.
What's Your Reaction?